चांगभलं प्रतिनिधी | कराड | ६ ऑगस्ट २०२६
कराड तहसीलदार कार्यालयासमोर वारंवार होणारी अवैध मटका,जुगार,दारू,अंमलीपदार्थ,ताडी,चक्री ,अवैध वाहतूक आदी अवैध धंद्यांविरोधात आंदोलन होत असतात.तसेच तहसील कार्यालयातील सेतू,निवडणूक शाखा व पुरवठा शाखा आणि परिवहन विभाग सुद्धा आंदोलना विषयीच्या केंद्र स्थानी असतात.
आंदोलनकर्त्याकडून एखादा विषय इतका प्रतिष्ठेचा बनवला जातो की आंदोलन अनेक दिवस चालवले जाते.आंदोलन सुरू झाल्यावर प्रशासनाकडून संवाद चर्चा केली जाते..मात्र आंदोलनातील मागण्यावर निर्णय काय झाला?आंदोलन अचानक रात्रीच पाठीमागे घेतले गेले?याचा उहापोह झाल्याचे प्रशासनालाही अवगत होत नाही.
वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे सर्वच कार्यकर्त्याकडे बघण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन साशंक रहात आहे.म्हणून या ठरावीक आंदोलनापाठीमागील भुमिका आणि हेतू याची चौकशी होऊन आंदोलनामागील गौडबंगाल काय?याच सत्य शोधून समाजासमोर आणण्यात यावे.जर आंदोलनाचा वापर व्यक्तीगत हितासाठी व केवळ प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी होत असेल तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी.
यासाठी दलित महासंघाचे वतीने दि.९ ऑगस्ट २०२६ (ऑगस्ट क्रांतीदिन) रोजी पासून कराड तहसीलदार कार्यालयासमोर ' आंदोलनामागील सत्य शोधा'आंदोलन करण्यात येणार आहे.
सदरचे आंदोलन दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष,आदिवासीसेवक प्रकाश वायदंडे हे प्रातिनिधिक स्वरूपात करणार असून कराड तालुक्यातील महसुल प्रशासन,पोलीस यंत्रणा,उत्पादन शुल्क विभाग,परिवहन विभाग तसेच अन्य विभागाचे प्रमुख यांचेसोबत चर्चा होवून कारवाईसाठी लेखी आश्वस्त होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे प्रकाश वायदंडे यांनी स्पष्ट केले आहे.सदरचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राम दाभाडे,रमेश सातपुते, सुरज घोलप,जयवंत सकटे,बाबासाहेब चव्हाण यांच्यासह अनेक चळवळीमधील मान्यवर प्रयत्न करीत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #दलितमहासंघ #सत्यशोधाआंदोलन #प्रकाशवायदंडे
#चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलं

0 टिप्पण्या