🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कोयना धरणातील पाणीसाठा ९२.४९ टीएमसीवर; २४,९०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

 


चांगभलं प्रतिनिधी | पाटण | ४ ऑगस्ट २०२६
सातारा जिल्ह्यासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरूच आहे. मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या आकडेवारीनुसार धरणाची पाणीपातळी २१५३ फूट ७ इंच (६५६.४१२ मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे.
सध्या धरणामध्ये एकूण (Gross) पाणीसाठा ९२.४९ टीएमसी (८७.८८ टक्के) असून उपयुक्त (Live) पाणीसाठा ८७.३७ टीएमसी (८७.२६ टक्के) इतका आहे.
गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना येथे ७ मिमी, नवजा येथे २९ मिमी आणि महाबळेश्वर येथे २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या २८ हजार ६७३ क्युसेक (०.९३ टीएमसी) पाण्याची आवक सुरू आहे.
दरम्यान, धरण व्यवस्थापनाकडून पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून १,०५० क्युसेक तर रेडियल दरवाजांतून २३ हजार ८५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीपात्रात एकूण २४ हजार ९०८ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
कोयना नदीकाठच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


➖➖➖➖➖➖

#कोयनाधरण #कोयनाविसर्ग #कोयनानगर #पाऊस 

#चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंन्यूज #चांगभलंसाप्ताहिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या