🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

दुचाकीवरच आली फिट; रस्त्यावर कोसळलेल्या युवकाला वाहतूक पोलिसाने दिले जीवदान

 कोल्हापूर नाक्यावर संदीप घोरपडे यांचे प्रसंगावधान; वाहतूक थांबवत युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल



चांगभलं प्रतिनिधी | कराड


कोल्हापूर नाक्यावर वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असताना अचानक एका दुचाकीस्वाराला दुचाकीवरच फिट आली आणि तो भरधाव वाहतुकीच्या रस्त्यावर कोसळला. रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या या युवकाच्या अंगावरून अवघ्या काही क्षणांत वाहन गेले असते तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता धाव घेतल्याने युवकाचा जीव वाचविण्यात यश आले.

शुक्रवारच्या या घटनेनंतर कराड वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संदीप घोरपडे यांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. कराडच्या कोल्हापूर नाक्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरळीत करण्याचे काम संदीप घोरपडे करीत होते.
त्याचवेळी एक दुचाकीस्वार अचानक दुचाकीवरच फिट आल्याने रस्त्यावर कोसळला. तो खाली पडताच त्याच्या डोक्याला व शरीराला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. त्याचवेळी रस्त्यावरून वेगाने वाहने धावत होती.
हा प्रसंग लक्षात येताच संदीप घोरपडे यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी युवकाकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने वाहतूक थांबवून वाहनांना नियंत्रित केले. त्यानंतर हायवेचे दस्तगीर आगा, अक्षय यादव,हेमंत पाटील, सुनील पवार
आप्पा चंदनशिवे या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या युवकाला सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला हलविले. त्याची दुचाकीही बाजूला घेण्यात आली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घोरपडे यांनी तत्काळ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. जखमी युवकाच्या मोबाईलवरून त्याचा पत्ता आणि नातेवाईकांची माहिती मिळवून त्यांनी त्याच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधला. त्यामुळे अपघातग्रस्त युवकाला वेळीच वैद्यकीय उपचार मिळण्याबरोबरच त्याच्या नातेवाईकांनाही घटनेची माहिती मिळाली.

वाहतूक नियंत्रणाच्या कर्तव्याबरोबरच मानवी जीव वाचविण्याला प्राधान्य देत संदीप घोरपडे यांनी दाखविलेली तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि प्रसंगावधान या घटनेतून अधोरेखित झाले. रस्त्यावर एखादा अपघात किंवा अचानक अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांची भूमिका केवळ वाहतूक नियंत्रणापुरती मर्यादित नसून, संकटाच्या क्षणी नागरिकांच्या मदतीला धावून जाणारी असते, याचा प्रत्यय या घटनेने आल्याची भावना सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप साळुंखे यांनी व्यक्त केली. संदीप घोरपडे यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय दराडे यांनी अभिनंदन केले.

वर्दीतली माणुसकी....

एका वाहतूक पोलिसाने दाखविलेल्या माणुसकीच्या हातामुळे संकटात सापडलेल्या युवकाला वेळीच मदत मिळाली. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावरील ही घटना केवळ पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची नव्हे, तर वर्दीआड दडलेल्या माणुसकीचीही जाणीव करून देणारी ठरली आहे.

➖➖➖➖➖➖

#कराडपोलीस #खाकीवर्दी #कराड #चांगभलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या