🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयात 'बी.एससी. ॲग्री' प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

 विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात मोफत प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू; कॉलेज कोड '१११३३' नोंदवण्याचे आवाहन



चांगभलं प्रतिनिधी | कराड

शिवनगर (तालुका कराड ) येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ (राहुरी) संलग्नित 'जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयात' शैक्षणिक वर्षासाठी बी.एस.सी. (ऑनर्स) कृषि या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. कृषि शिक्षणात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

कॅप राउंड प्रक्रियेदरम्यान प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयाचा कॉलेज कोड १११३३ असा आहे.

प्रवेश अर्ज कसा भरावा, ऑप्शन फॉर्म कसा नोंदवावा आणि कॅप राउंड प्रक्रियेची अचूक माहिती मिळावी यासाठी महाविद्यालयाच्या वतीने विशेष मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महाविद्यालयात प्राधान्यक्रम नोंदवणे आणि एकूणच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना तसेच पालकांना प्राध्यापकांकडून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे.

दर्जेदार शिक्षण, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक प्रक्षेत्र आणि उत्कृष्ट प्लेसमेंटचा वारसा असलेल्या या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयाच्या मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖

#जयवंतरावभोसलेकृष्णाकृषीमहाविद्यालय #कृषीअभ्यासक्रमप्रवेश

#कृषीमहाविद्यालय #शिवनगर #रेठरेबुद्रुक #कराड #चांगभलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या