🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

भाजपा सेवा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना गती



चांगभलं प्रतिनिधी | सातारा


भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सातारा येथे नुकतेच सेवा अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना गती मिळण्यास मदत झाली.
सातारा येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सेवा अभियान पार पडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांनी नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विविध शासकीय कामांसंदर्भातील निवेदने स्वीकारली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या, प्रलंबित प्रकरणे तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये अडकलेल्या कामांची सविस्तर माहिती जाणून घेतली. ज्या प्रकरणांमध्ये तातडीने प्रशासकीय हस्तक्षेप आवश्यक आहे, अशा विषयांबाबत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, नियमांच्या चौकटीत आवश्यक ती कार्यवाही करून कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सूचना करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गती मिळाली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदार धैर्यशील कदम, पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर, सुनील काटकर, प्रशांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, मनीषा पांडे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले, सोशल मीडिया प्रदेश सदस्य रवींद्र लाहोटी, स्वप्नील पाटील, राहुल शिवनामे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖

#भाजपा #सातारा #अतुलबाबाभोसले #SataraNews

#चांगभलं #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर

#चांगभलंसाप्ताहिक #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या