🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

संस्थेच्या जडणघडणीत कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे : डॉ. सुरेश भोसले

 कृष्णा विश्व विद्यापीठातील ६६ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कृष्णा सेवागौरव पुरस्काराने सन्मान



हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

कोणत्याही संस्थेच्या जडणघडणीत कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असते. कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कच्या माध्यमातूनच संस्थेची प्रगती शक्य होते, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या ६६ कर्मचाऱ्यांना ‘कृष्णा सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर कृष्णा विश्व विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन. उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे उपस्थित होते.

 



यावेळी डॉ. भोसले म्हणाले, नोकरीचे ठिकाण हे कर्मचाऱ्यांना ओळख मिळवून देते. कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे संस्थेची प्रगती होते. कर्मचारी हे संस्थेचे ‘अॅसेट’ आहेत. प्रत्येकाच्या योगदानातून संस्था घडत असते. त्यामुळे संस्थेसाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. सेवानिवृत्ती हा प्रवासाचा शेवट नसून नव्या पर्वाची सुरुवात आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा.



कार्यक्रमाला कृष्णा विश्व विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे, नर्सिंग विभागाच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीच्या डॉ. शुभांगी पाटील, नर्सिंग डायरेक्टर रोहिणी बाबर यांच्यासह कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक विक्रम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक व्यवस्थापक चेतन गोरे यांनी स्वागत केले. जगजीत घोरपडे यांनी आभार मानले.


➖➖➖➖➖➖➖➖

#कृष्णाविश्वविद्यापीठ #डाॅसुरेशभोसले #कराड #चांगभलं

#चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर #साप्ताहिकचांगभलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या