चांगभलं प्रतिनिधी | कराड
विजयनगर ता. कराड येथील महाकाली विकास सेवा सोसायटी लि.च्या सभेत आज दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या नावाने ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळाने हा ठराव बहुमताने मंजूर केला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व सभासदांनी मा.आ आनंदराव पाटील (नाना) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत सहकार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची तसेच शेतकरी हितासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा निर्णय घेतला.
या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन नवनाथ यादव, व्हाइस चेअरमन शिवाजीराव जाधव, विश्वासराव पाटील, भरत संकपाळ, दगडू यादव, शशिकांत कुमठेकर, धनंजय शीलवंत, सौ. अलका पाटील, सचिव जहीर मुल्ला तसेच मुंडे गावचे मा. सरपंच आनंदराव जमाले, मा. सरपंच रमेश लवटे, विजयराव कदम, वसंतराव पाटील, दिलीपराव पाटील, नागेंद्र कोरे, माजी सरपंच संजय शीलवंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार व्हा.चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी मानले.
➖➖➖➖➖➖➖➖
#साताराजिल्हाबँक #जिल्हाबँकनिवडणूक #विजयनगरसोसायटी
#आनंदरावपाटील #कराड #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलं
#चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं #ChangbhalaNews

0 टिप्पण्या