हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या वतीने यशस्वी हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट कोपर्डे हवेली जिल्हा प्राथमिक केंद्र शाळा येथे 14 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या प्रोजेक्टसाठी क्लबच्या वतीने शाळेसाठी उपयुक्त असणारे सर्व शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, ग्रोसरी, स्वच्छतेचे साहित्य तसेच शाळेसाठी उपयुक्त असणारे सर्व साहित्य देण्यात आले.
यावेळी प्राथमिक केंद्र शाळा कोपर्डे हवेली येथील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांनी हाती घेतलेल्या हॅप्पी स्कूल या प्रोजेक्ट अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट, लेझीम, स्पोर्ट्स ड्रेस, खेळाचे विविध साहित्य तसेच गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आली.
14 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा कोपर्डेहवेली येथे लेझीमच्या निनादात इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या सर्व सदस्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देसाई यांनी केले.
क्लबच्या प्रेसिडेंट मनीषा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
क्लब नेहमीच शालेय विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे घेऊन सहकार्यासाठी तत्पर असतो असे आपल्या मनोगतमध्ये प्रेसिडेंट मनीषा पाटील यांनी सांगितले.
क्लबच्या वतीने शाळेसाठी व शाळेतील मुलांसाठी केलेली ही मदत आमच्यासाठी खरोखरच खूप भारावून टाकणारी आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देसाई यांनी सर्व क्लब मेंबरचे आभार मानले.
प्रोजेक्टसाठी क्लबच्या प्रेसिडेंट मनीषा पाटील, सेक्रेटरी हेमलता फुटाणे, छाया पवार, सारिका शहा नंदावळकर, रतन शिंदे, शिवांजली पाटील, तरुणा मोहिरे, विद्या पावस्कर, सुषमा तिवारी, अंजना माने, सपना लुनिया, सारिका वेल्हाळ, मुस्कान तलरेजा, मृणाल कुलकर्णी, दिपाली लोहार, सुकेशनी कांबळे,सुवर्णा केंजळे, स्मिता शहा, अनिता शुक्ला, रूपाली तपासे, सारिका कदम, पद्मजा जाधव, रजनी भोंगाळे, प्रिया भोंगाळे, अमृता उकिरडे, वंदना केंजळे, तसेच क्लबचे सर्व मेंबर, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖
#इनरव्हीलक्लबकराडसंगम #कोपर्डेहवेली #चांगभलंन्यूज

0 टिप्पण्या