🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सैदापूर कृष्णाकाठ वृक्षारोपण व सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड

१५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून "सैदापूर कृष्णाकाठ वृक्षारोपण व सुशोभीकरण प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ, मिलिटरी बॉईज होस्टेल सैदापूर, कृष्णा नदीच्या तीरावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.



सैदापूर ग्रामपंचायत, विजय दिवस समारोह समिती, कराड व एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.



सैदापूरचे ग्रामस्थ , ग्रामसेवक नेताजी काळभोर व त्यांचे सर्व सहकारी , कराड पंचायत समितीच्या सदस्या सौ. माधवी पाटसुपे, सरस्वती विद्यामंदिरच्या मुख्याधिपिका सौ. रुपाली तोडकर, सेवानिवृत्त तहसीलदार बी एम. गायकवाड, सामाजिक वनीकरण कराड विभागाचे फॉरेस्ट ऑफिसर श्री उमाकांत ननवारे, मिलिटरी बॉईज होस्टेलचे सुपरिटेंड दिलीप पाटील, सी. ए. विनोद सावंत, उद्योगपती सलिम मुजावर, प्रा.जालिंदर काशिद, नगर अभियंता ऐ आर पवार, प्रा . रजनिश पिसे, रत्नाकर शानभाग, प्रमोद तोडकर डॉ मानिक बनकर, ग्रंथपाल संजय शिंदे, रमेश पवार इत्यादी पर्यावरण व निसर्ग प्रेमी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



प्राचार्य गणपतराव कनसे यांनी प्रास्ताविक केले, प्राचार्य सतिश घाटगे व विज्ञान व पर्यावरणवादी डॉ. सुधीर कुंभार यांनी सैदापूर कृष्णाकाठ वृक्षारोपण व सुशोभीकरण प्रकल्प हा नैसर्गिक प्रकल्प आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गसौंदर्याचा सर्वानाच आनंद मिळणार आहे. असे मनोगत व्यक्त केले, सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सैदापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सर्व प्रकारचे सहकार्य राहणार आहे. हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच आपण सर्वजन एकत्र आलो आहोत, लवकरच तो पूर्ण होईल असे मत व्यक्त केले. प्राचार्य गणपतराव कनसे यांनी प्रास्ताविक केले,विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलासराव जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. बी एस खोत यांनी सुत्रसंचलन केले.
➖➖➖➖➖➖➖

#सैदापूर #सैदापूरबातमी #विद्यानगरकराड #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या