🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

जिल्ह्यातील शाळांनी ‘BNHS निसर्ग मंडळा’त सहभागी व्हावे

 विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची वैज्ञानिक दृष्टी व जबाबदारी विकसित करण्यासाठी उपक्रम



चांगभलं प्रतिनिधी | कराड

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि शाश्वत जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई (BNHS)तर्फे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘BNHS निसर्ग मंडळ’ (Nature Club) हा पर्यावरण शिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन १८८३ मध्ये स्थापन झालेली BNHS ही भारतातील वैज्ञानिक संशोधन, जैवविविधता अभ्यास आणि निसर्गसंवर्धन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणीय जाणीव आणि संवर्धनाची जबाबदारी विकसित करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून विविध कृतीशील कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमाबाबत अधिक माहिती देतांना बी.एन.एच.एस.चे संचालक श्री. किशोर रिठे यांनी सांगितले की उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सातारा, अमरावती , अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘BNHS निसर्ग मंडळ’ स्थापन करण्यात येणार असून, सातारा जिल्ह्यात क्रिएटिव्ह नेचर फ्रेंड्स कराड ही सहयोगी संस्था म्हणून कार्य करणार आहे. स्वच्छ पर्यावरण, जैवविविधता संवर्धन, शाश्वत विकास, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि **शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs)** याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणविषयक व्याख्याने, संवादात्मक सत्रे, कार्यशाळा, निसर्ग खेळ, प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रम आणि विविध संवर्धन मोहिमा आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक वनस्पती, पक्षी व वन्यजीवांचा प्रत्यक्ष परिचय व्हावा यासाठी जवळच्या नैसर्गिक अधिवासांना शैक्षणिक भेटीही आयोजित केल्या जाणार आहेत. पर्यावरणीय समस्या, प्रदूषण तसेच वन्यजीवांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यावरही भर दिला जाणार आहे.

सहभागी शाळांमधील शिक्षकांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रमआयोजित करण्यात येणार असून, पर्यावरणीय विषयांवरील मार्गदर्शनासह शैक्षणिक साहित्यही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळेतील निसर्ग मंडळाला संबंधित जिल्ह्यातील सहयोगी संस्थेशी जोडण्यात येईल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पर्यावरणविषयक कृतीशील जनजागृती सत्रे राबविण्याची संधीही शाळांना मिळणार आहे.



*उत्कृष्ट शाळेला १० हजारांचे पारितोषिक*

या उपक्रमात सहभागी शाळांमधून प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळेला १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक** देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी शाळेला ‘निसर्ग संच’भेट देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रत्यक्ष पर्यावरणीय कृती राबविण्यास शाळांना प्रोत्साहन मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेत ‘BNHS निसर्ग मंडळ’ सुरू करून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निसर्गाशी विद्यार्थ्यांचे नाते दृढ करण्याबरोबरच भावी पिढीमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तरी इच्छुक शाळांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्रिएटिव्ह नेचर फ्रेंड्स तथा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्याशी संपर्क करावा.


कराड तालुक्यातील शिक्षकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण...


दिनांक 20 ऑगस्ट रोजी कराड तालुक्यातील शिक्षकांचे एक दिवसाचे प्रशिक्षण टिळक हायस्कूल कराड येथे आयोजित करण्यात आले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #BNHS #जैवविविधतासंवर्धन #शाळा

#शिक्षकप्रशिक्षण #चांगभलं #चांगभलंसाप्ताहिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या