🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कोयना धरणातून सांडव्यावरील विसर्ग बंद; पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक विसर्ग नदीपत्रात सुरू

 


हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी | कोयनानगर

कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज, २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णपणे खाली आणण्यात आले असून, सांडव्यावरून कोयना नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. मात्र, कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.
सायंकाळी ५ वाजताच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, कोयना धरणाची पाणीपातळी २,१५८ फूट ०३ इंच (६५७.८३५ मीटर) इतकी आहे. धरणातील एकूण साठा ९८.४६ टीएमसी (९३.५५ टक्के), तर उपयुक्त जिवंत साठा ९३.३४ टीएमसी (९३.२२ टक्के) इतका झाला आहे.
धरणात सध्या ६,८९३ क्युसेक पाण्याची आवक होत असून, त्यापैकी १,०५० क्युसेक पाणी पायथा विद्युतगृहातून सोडले जात आहे. सांडव्यावरील सहा वक्र दरवाजे सध्या बंद असून रेडियल गेटमधून विसर्ग शून्य आहे.
दरम्यान, आज कोयना येथे ४ मिमी, नवजा येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोयना येथे ३,८३१ मिमी, नवजा येथे ४,८४६ मिमी, तर महाबळेश्वर येथे ४,९९३ मिमी संचयी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन भविष्यात सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग वाढविला जाऊ शकतो. त्यामुळे कोयना नदीपात्रालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
नदीकाठावरील गावांचे ग्राम प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


कोयना धरणाची सद्यस्थिती --
२० ऑगस्ट २०२६, सायं. ५ वाजता...



पाणीपातळी : २,१५८ फूट ०३ इंच
एकूण साठा : ९८.४६ टीएमसी (९३.५५%)
जिवंत साठा : ९३.३४ टीएमसी (९३.२२%)
धरणात आवक : ६,८९३ क्युसेक
पायथा विद्युतगृह विसर्ग : १,०५० क्युसेक
रेडियल गेट विसर्ग : ० क्युसेक
एकूण विसर्ग : १,०५० क्युसेक
— चांगभलं न्यूज

➖➖➖➖➖➖➖

#कोयनाधरण #Koynadam #कोयनाविसर्ग #कराड

#कोयनानगर #कोयनानदी #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या