हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
उंडाळे (तालुका कराड) येथील दि इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उंडाळे पोलिस स्टेशनच्या PSI स्नेहल चरापले मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट देशभक्तीपर गीत गायन केले तर काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरणा विषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून शाळेने 'एक मुल..... एक झाड ' उपक्रम राबवला होता. यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी शेवग्याच्या झाडाच्या बिया लावून १७५ हून अधिक रोपे तयार केली होती. व इतर रोपामध्ये शोभेसाठीचीची १७५ रोपे तयार केली. यासाठी SR दळवी फाऊंडेशनच्यावतीने तसेच शाळेच्या संस्थापिका सौ. गीतांजली पाटील मॅडम यांनी केलेल्या आवाहनानुसार 'मिनी नर्सरी' देखील तयार करण्यात आली होती.
या कार्यक्रमात त्या रोपांचे वाटप व SR दळवी फाऊंडेशन तर्फे मिळालेल्या सहभाग प्रमाणपत्रांचे वाटप पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी SR दळवी फाऊंडेशनचे प्रतिनिधी श्री. मोहनराव पाटील सर, उंडाळे गावचे उपसरपंच श्री. अजित कदम, श्री. बाबूराव चोपडे देखील उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणासोबत जोडण्याच्या प्रयत्नांचे PSI स्नेहल चरापले मॅडम तसेच शाळेच्या संस्थापिका सौ. गीतांजली पाटील मॅडम यांनी कौतुक केले.
या उपक्रमासाठी शाळेचे क्रीडा व हरित शिक्षक श्री पी. टी. पाटील सर, वीर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री धनाजी देसाई सर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
➖➖➖➖➖➖➖
#उंडाळे #दिइंग्लिशमीडियमस्कूलउंडाळे #चांगभलं
#चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंन्यूज #ChangbhalaNews
#SRदळवीफाउंडेशन #कराड

0 टिप्पण्या