🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अहिल्यादेवी ट्रस्टचे कार्य प्रेरणादायी : श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार

 


शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागात ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

चांगभलं प्रतिनिधी | शाहूवाडी
दुर्गम व डोंगराळ भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड गेल्या २५ वर्षांपासून करीत असलेले कार्य प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार यांनी केले.
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यातील उदगीरी, गुरववाडी, केदारलिंगवाडी आणि बौद्धवाडी या दुर्गम भागातील १०७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार बोलत होते.


अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या माध्यमातून कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील डोंगराळ व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शैक्षणिक चळवळीला बळ देण्याचे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ट्रस्ट करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार यांनी सांगितले.
ट्रस्टच्या वतीने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात २ हजार ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच १ हजार मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येणार असून, या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार यांच्या हस्ते करण्यात आला.
डोंगरदऱ्या आणि जंगल परिसरातील अनेक विद्यार्थी वन्यप्राण्यांच्या भीतीच्या छायेत शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थ्यांना दररोज पाच ते सहा किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागते. प्रतिकूल परिस्थिती असतानाही शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याने हे विद्यार्थी शिक्षणाची कास धरून आहेत. अशा विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टकडून मिळणारे पाठबळ कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, प्रवीण काकडे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असून, विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरून भविष्यात प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रांत यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीतूनच समाजाचा विकास साध्य होईल, असे त्यांनी सांगितले.


अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने आतापर्यंत सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व आर्थिक मदत केली आहे. तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्याचे कार्यही ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ग्रामीण व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत जनजागृती करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य ट्रस्ट सातत्याने करीत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यातील उदगीरी, गुरववाडी, केदारलिंगवाडी आणि बौद्धवाडी येथील १०७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच कराड तालुक्यातील धोंडेवाडी प्राथमिक शाळेतील अंगणवाडीच्या ७० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. पलूस, जि. सांगली येथील एस.पी. अकॅडमीमधील ३७ विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक रोशन मुडे यांनी प्रास्ताविक केले, तर विलास पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सरपंच प्रदीप पाटील, पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील, चेतन पाटील, विकास पाटील, शालन पाटील, प्रदीप घाडगे, पांडुरंग गावडे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖

#अहिल्यादेवीट्रस्ट #शाहुवाडीतालुका #प्रवीणकाकडे

#श्रीमंतयोगीराजगायकवाडसरकार #शालेयसाहित्यवाटप

#चांगभलंन्यूजपेपर #चांगभलं #चांगभलंसाप्ताहिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या