🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड दक्षिण मधील पिकांच्या नुकसानीची आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी थेट शेतात जाऊन केली पाहणी

 शेतकऱ्यांशी साधला संवाद ; दुष्काळी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी



चांगभलं प्रतिनिधी | कराड


कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची तसेच पिकांच्या नुकसानीची आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मनव, साळशिरंबे, महारूगडेवाडी, बोत्रेवाडी, आकाईचीवाडी, जिंती, टाळगाव आणि घोगाव या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, कराड दक्षिणमधील दुष्काळ परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच कराड तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करावा यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून, दूरध्वनीवरुनही संवाद साधला आहे. यंदाच्या हंगामात भुईमूग, सोयाबीन यांसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे संबंधित कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 




कराड तालुक्यात ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या भागांचा दुष्काळ परिस्थितीच्या निकषांत समावेश करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि नुकसानग्रस्त पिकांचे योग्य सर्वेक्षण होऊन शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी पंकज पाटील, प्रविण साळुंखे, निळकंठ शेडगे, तानाजी चवरे, धोंडीराम चोरगे, मच्छिन्द्र साळुंखे, जयवंत शेवाळे, संतोष पाटील, दत्तात्रय पाटील, दादासो शेवाळे, संताजी शेवाळे, अशोक पाटील, जयसिंग जाधव, सागर जाधव, रविंद्र सपकाळ, निवास शेवाळे, संदीप भावके, दिलीप सूर्यवंशी, निवास जाधव, सचिन बागट, हंबीराव पाटील यांच्यासह उंडाळे मंडल कृषी अधिकारी सपना देव्हारे, उपकृषी अधिकारी विशाल जगदाळे, बाबा तोरणे, अश्विनी कुबडे, रोहित शिगावकर आदी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


शेतकऱ्यांना न्याय्य मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू - - आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

" शेतकऱ्यांवर आलेल्या या कठीण परिस्थितीत त्यांना एकटे सोडले जाणार नाही. पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना न्याय्य मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू. पाण्याचे व्यवस्थापन आणि भविष्यातील पीक नियोजनाबाबतही संबंधित विभागांसोबत चर्चा करण्यात येईल."
- आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या