चांगभलं प्रतिनिधी | कराड
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सातारा पंचवार्षिक निवडणुकीसाठी कराड तालुका पंचायत समितीचे काँग्रेस पक्षाचे सदस्य रवींद्र बडेकर यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी ही निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे माजी चेअरमन आनंदराव घोडके, सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव जमाले, मुंढे गावचे माजी सरपंच महम्मद आवटे, सातारा जिल्हा युवक काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय जमाले, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष खालीद पटेल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रवींद्र बडेकर यांच्या उमेदवारीमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने या निवडणुकीकडे कराड तालुक्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
➖➖➖➖➖

0 टिप्पण्या