🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी कराड उत्तर काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड

कराड तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून कराड तालुका हा शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने कराड उत्तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबुराव पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कराड येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

प्रारंभी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर छ. शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी कराड तालुका दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य अजितराव पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुनंदा पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖

#karad #Congress #baburaopawar #दुष्काळग्रस्ततालुके #चांगभलंन्यूजपेपर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या