🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षणमध्ये समाजातील मतदारांची नावे कमी करण्यात येवू नयेत; पारधी मुक्ती आंदोलनाची प्रशासनाकडे मागणी.

 


चांगभलं प्रतिनिधी | सातारा-कराड

मतदार याद्या सखोल पुनरिक्षण सर्वेक्षणाने २००२पुर्वीचे मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्याने पारधी जमातीच्या कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात येऊ नये अशी मागणी पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष आदिवासीसेवक प्रकाश वायदंडे यांचे शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.शिष्टमंडळात सातारा जिल्हाध्यक्ष कैलास पवार,यगदेश काळे व लखांड्या काळे यांचा समावेश होता.निवेदनात पुढे म्हटले आहे की,
सातारा जिल्हा प्रशासनाकडून अनुसूचित पारधी जमातीचे कुटुंबाचे पुनर्वसन प्रक्रिया सन २००२ पासून सुरू करण्यात आली आहे .आदिवासी पारधी कुटुंबे वास्तव्य करून राहत असलेल्या गावी मतदार यादी मध्ये नोंदी २००६ /०७ पासून झालेल्या आहेत. त्यामुळे 'विशेष सखोल पुनरिक्षण' सर्वेक्षणामध्ये पारधी कुटुंबाच्या नोंदी २००२ सालच्या यादीमध्ये समावेश आढळून आलेल्या नसल्याचे पारधी कुटुंबांची नावे मतदार यादी मधून वगळण्यात येऊ नयेत .पारधी कुटुंब मतदानाचे हक्कापासून वंचित राहू नये ,यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. तसेच पारधी कुटुंबाकडून रेशन कार्ड ,आधार कार्ड ,जमातीचा दाखला अथवा मिळकतीचा उतारा इत्यादी पैकी पुरावा संबंधित सर्वेक्षक यांनी स्वीकारून पारधी नावे मतदार यादी मध्ये कायम ठेवण्यात यावीत, अशी मागणी पारधी मुक्ती आंदोलनाचे वतीने जिल्हा प्रशासनाकडे केली गेली आहे.


➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या