पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता
चांगभलं प्रतिनिधी | कराड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशसेवेला दिलेल्या २५ वर्षांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात काढण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या यात्रेत, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मलकापुरातील भाजपा कार्यालयापासून ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात या यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर ही यात्रा कोयना वसाहत (ता. कराड) येथील राजाभाऊ कोटणीस हॉलमध्ये पोहोचली. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन थेट प्रक्षेपणाद्वारे मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आले. सेवा हीच राष्ट्रनिर्मितीची खरी शक्ती असून, जनसेवेतून देशाला अधिक सामर्थ्यवान बनविण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, सेवा संकल्प अभियानांतर्गत गेले महिनाभर आम्ही समाजातील विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र प्रदेश भाजपने दिलेले विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये सातारा जिल्हा सर्वपरीने आपले योगदान देईल, याची मला खात्री आहे.
यावेळी विकसित भारत घडविण्याची शपथ घेण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, कराड पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, सदस्य पैलवान धनंजय पाटील, ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका साळुंखे, शैलजा शिंदे, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पिनू जाधव, मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, प्रवीण साळुंखे, एकनाथ बागडी यांच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖


0 टिप्पण्या