🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

किसान सभेच्या राज्य अधिवेशनात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा ; २६ ऑक्टोबरला अकोले ते मुंबई वाहन लॉंग मार्च होणार

 दुष्काळ, कर्जमाफी, जमीन मालकी, पीक विम्यासह शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी निर्णायक आंदोलन उभारणार



चांगभलं प्रतिनिधी | कोल्हापूर

अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य २४व्या अधिवेशनाची कोल्हापूर येथे जोरदार आंदोलनाच्या घोषणेसह यशस्वी सांगता झाली. 6, 7, 8 ऑक्टोबर या काळात ही अधिवेशन घेण्यात आले. दुष्काळ, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी, देवस्थान इनाम वर्ग-३, वनजमीन, गायरान व वरकस जमीन, पीक विमा आदी प्रश्नांवर राज्यव्यापी निर्णायक आंदोलन उभारण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथून मुंबईच्या दिशेने शेकडो वाहनांचा राज्यव्यापी वाहन लॉंग मार्च काढण्याची घोषणा करण्यात आली.

अधिवेशनात डॉ. अजित नवले यांनी मांडलेला राजकीय, वैचारिक, संघटनात्मक व कामकाजाचा अहवाल एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या ३०६ प्रतिनिधींनी अहवालावर आपले विचार मांडले.

जनवादी महिला संघटनेच्या केंद्रीय नेत्या मरियम ढवळे, सीटूचे कामगार नेते एम. एच. शेख, जनवादी महिला संघटनेच्या प्राची हातिवलेकर, विद्यार्थी नेते नवनाथ मोरे आणि शेतमजूर युनियनचे साहेबराव कसबे यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. आ. विनोद निकोले यांनी अधिवेशनाला संबोधित केले.

आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत पाटील यांनीही अधिवेशनाला भेट देऊन शेतकरी आंदोलनाबाबत भ्रातृभाव व्यक्त केला.

*अकोले ते मुंबई वाहन लॉंग मार्चची घोषणा*

कर्जमाफी, भीषण दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अकोले येथे भव्य महामुक्काम आंदोलन करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला.

या आंदोलनाची सुरुवात करण्यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजी अकोले येथे भव्य मोर्चा काढून राज्य सरकारला आंदोलनाचे निवेदन देण्यात येईल. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी अकोले येथे राज्यव्यापी महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात येईल.

राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २२ ऑक्टोबर रोजी केंद्रीय नेत्या कॉ. वृंदा करात, किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित आणि आ. विनोद निकोले अकोले येथे महामुक्काम आंदोलनाला भेट देऊन भव्य सभेला संबोधित करतील.

तरीही राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २६ ऑक्टोबर रोजी अकोले येथून शेकडो वाहनांचा समावेश असलेला राज्यव्यापी वाहन लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना होईल. हा लॉंग मार्च २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत पोहोचेल आणि तेथे राज्यव्यापी बेमुदत महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात येईल.

किसान सभेने राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याचा इशारा देत, या आंदोलनात राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या