चांगभलं प्रतिनिधी | सातारा
शासकीय सेवेतील आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिक व शिस्तबद्ध, पारदर्शक कामकाज सहकारी संस्था व सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य कर्जदार व ठेवीदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे सातारा जिल्ह्याचे विशेष लेखापरीक्षक वर्ग १, सहकारी संस्थेचे अधिकारी मा. श्रीधर कोल्हापुरे यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला सातारा येथे शेतकरी संघटना व शिवराष्ट्र युवक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा पार पडला.
मा. श्रीधर कोल्हापुरे सर यांनी आपल्या कार्यकाळात जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १, म्हणून अत्यंत पारदर्शक व लोकाभिमुख आणि गतिमान कारभार केलेला आहे व करीत आहेत, सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करून शेतकऱ्याशी निगडित संस्थांना योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहे, शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जदारांचे प्रश्न, ठेविदारांचे प्रश्न, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने कायद्याच्या मार्गाने मिटवलेले आहेत, " त्यामध्ये कर्जदाराचे, ठेवीदारांचे, शेतकऱ्याचे व संस्थाचे हित असणारे निर्णय मा. श्रीधर कोल्हापुरे सरांनी घेतलेले आहेत '' त्यांच्या याच प्रशासकीय कौशल्याचे आणि शेतकरी हिताच्या कामाचे सर्व स्तरातून खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. या सत्कार प्रसंगी बोलताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव पाटील यांनी , श्रीधर कोल्हापूरे साहेबांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी यादया चौकशी, तपासणी संदर्भात कोल्हापुरे सरांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र लीड बँके चे जे काम आहे, त्या कामांमध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणे कामी कोल्हापुरे सरांनी शासनाकडे पाठपुरावा करून विना निकष सर्वच शेतकऱ्यांना न्याय द्यावा, कोणीही शेतकरी वंचित राहू नये सर्व शेतकरी कर्जमुक्त व्हावेत यासाठी शासनाकडे तसा पाठपुरावा देखील करावा,अशी विनंती केली. तसेच कोल्हापुरे सरांनी खूप अत्यंत प्रामाणिक,पारदर्शक उत्कृष्ट काम केले असल्याचे सांगितले. श्रीधर कोल्हापुरे साहेबांच्या पारदर्शक, स्वच्छ कारभाराबाबत- शिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष, व शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.रघुनाथरावदादा पाटील यांनी देखील फोनवरून श्रीधर कोल्हापुरे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शिवराष्ट्र युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी पतसंस्थामधील भ्रष्टाचार घोटाळे - अपूर्ण कर्ज देणे, लुबाडणूक- लूट करणे, मासिक चक्रवाढ व्याज घेणे, मुदलीकरण, कर्जामधील बेकायदेशीर कपाती,प्रतिष्ठान, स्वयंरोजगार व इमारत निधी घेऊन गोरगरीब कर्जदार शेतकऱ्यांची होणारी लूट, व होणारी बेकायदा जप्ती व लिलाव कारवाई व बंद पडलेल्या संस्था व ठेवीबाबत संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली, व यामध्ये देखील सुवर्णमध्य काढून ठेवीदारांना कर्जदारांना न्याय देण्याची मागणी केली , व कोल्हापुरे सरांनी या संस्थांच्या बाबतीत खूप चांगली भूमिका घेतली असून भविष्यातही कठोरात- कठोर निर्णय घेऊन या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली, यावेळी अत्यंत उत्कृष्ट काम केले बद्दल, खूप शेतकऱ्यांना ठेवीदारांना व कर्जदारांना अत्यंत चांगली वागणूक देऊन त्यांचे विषय सोडवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. सौ. धुमाळ मॅडम, ॲड. सौ. अश्विनी पाटील मॅडम, माजी सरपंच, व माजी सैनिक नारायण सुर्वे, रसूलभाई मुलानी, खाशाबा जाधव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिनराव पाटील, एस. के.पाटील, शंकर सुर्वे, रामचंद्र येळवे, उत्तम खबाले, रंजनाताई पाटील, अशोकराव पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव पाटील, शिवराष्ट्र युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी पवार उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖
#श्रीधरकोल्हापुरे #शिवराष्ट्रसंघटना #शेतकरीसंघटना #विशेषलेखापरीक्षक #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews

0 टिप्पण्या