नवी मुंबई | चांगभलं वृत्तसेवा
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ च्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे भारताला तब्बल २५ वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी तीन वेळा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचूनही विश्वचषक जिंकू शकलेला नाही. आता कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.
![]() |
| फोटो सौजन्य - ICC |
नवी मुंबईत सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी मात, जेमिमा रॉड्रिग्जची शतकी खेळी ठरली निर्णायक
भारतीय संघाची भक्कम फलंदाजी...
३३८ धावांचे आव्हान पेलताना भारताने ४८.३ षटकांत ५ गडी गमावून ३४१ धावा करत विजय साकारला.
जेमिमा रॉड्रिग्ज हिने अप्रतिम शतक झळकावत १३४ चेंडूत १२७ धावा करत विजयाची पायाभरणी केली.
कर्णधार हरमनप्रीत कौरने ८९ धावांची झंझावाती खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले.
शेवटच्या क्षणी अमनज्योत कौर हिने तब्बल २०० च्या स्ट्राईक रेटने ८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने सुंदर फटकेबाजी करत आव्हानात्मक स्थितीत १५ धावा करून भारताचा विजय साकारला. आणि संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवले.

Photo credit - ICC
भारताने रचला इतिहास...
कर्णधार हर्मनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३३८ भावांचे लक्ष गाठताना ३४१ धावा पूर्ण करून सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विश्वविक्रम ही या सामन्यात रचला.

Photo credit - ICC
ऑस्ट्रेलियाचा डाव – फोबी लिचफिल्डचं शतक व्यर्थ...
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने ४९.५ षटकांत सर्वबाद ३३८ धावा केल्या.
फोबी लिचफिल्ड हिने शतकी खेळी करत १०० धावा केल्या, पण भारतीय गोलंदाजांनी शेवटी जोरदार पुनरागमन केलं.
सामन्याचा टर्निंग पॉईंट...
जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांची १६० धावांची भागीदारी भारतीय विजयाचा पाया ठरली.
त्यानंतर रिचा घोष आणि अमनज्योत कौर यांनी जलद धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. स्मृती मानधना अवघ्या २४ धावावर असताना बाद झाली. मात्र जेमिमा, हर्मनप्रीत जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. दीप्ती (२४) आणि ऋचा घोष (२६) यांच्या कमी चेंडूत धमाकेदार धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली.
आता लक्ष्य – अंतिम फेरी...
या विजयानंतर भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता संपूर्ण देशाचे लक्ष अंतिम सामन्याकडे आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम लढतीत भारताला २५ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. दोन नोव्हेंबरला विश्वचषकाचा हा अंतिम सामना रंगणार आहे.
#INDvAUS #WomensWorldCup2025 #JemimahRodrigues #HarmanpreetKaur #TeamIndia #IndianWomenCricket #AmanjotKaur #CricketNews #ChangbhalaNews #NaviMumbai #INDWvsAUSW #WorldCupFinal #BharatiyaMahilaSangh #WomenInBlue #CricketFever #चांगभलंन्यूज #क्रिकेट #मैदान #नवी_मुंबई

0 टिप्पण्या