🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत – जिल्हाधिकारी संतोष पाटील

photo - changbhala-news.blogspot.com

सातारा प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी या मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, सर्व प्रांत अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी सूचित केले की, जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. नोंदणीचे काम मिशन मोडवर करावे, तसेच प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करावे.
पदवीधर मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांची व महाविद्यालयांची मदत घेणे, तसेच ज्या शिक्षकांकडे पदवीधर पात्रता आहे त्यांची पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची माहिती घेऊन त्यांची नोंदणी पूर्ण करावी. एकही शिक्षक नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले आहेत.

मुख्य मुद्दे....
पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी अंतिम मुदत : ६ नोव्हेंबर
सर्व तालुक्यांतील अधिकारी व शिक्षकांनी नोंदणी तातडीने पूर्ण करावी
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिलेत स्पष्ट निर्देश.


#ChangbhalaNews #Satara #Election2025 #GraduateVoter #TeacherVoter #SantoshPatil #VoterRegistration #Karad #MaharashtraNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या