कराड, दि. १० नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर नेमणूक केलेल्या प्रत्येक टीमने आपले दिलेले काम जबाबदारीने, काळजीपूर्वक, वेळेत व अचूकपणे पार पाडावे अशा सूचना करून या निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौ रोहिणी शिंदे, नायब तहसीलदार युवराज पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, बाबुराव राठोड, व्ही आर राजपूत यांची उपस्थिती होती.
प्रांताधिकारी म्हेत्रे साहेब पुढे म्हणाले, आपण निवडणुकीचे अत्यंत महत्त्वाचे काम करतोय हे लक्षात घेऊन एकत्रित व सामूहिक जबाबदारीने टीमवर्क म्हणून हे काम पार पाडून विधानसभेला ज्या पद्धतीने उत्कृष्ट कामकाजाने महाराष्ट्रभर कराड तालुक्याची ख्याती झाली त्याच पद्धतीने आताही काम करावयाचे आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता टाऊन हॉल कराड येथे तर दुसरे प्रशिक्षण 23 नोव्हेंबर 2025 रोजी टाऊन हॉल कराड, तर तिसरे प्रशिक्षण 1 डिसेंबर 2025 रोजी बहुउद्देशीय हॉल कराड या ठिकाणी होणार आहे.
नेमणूक कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या ऑर्डर सोबत टपाली मतपत्रिका मागणी फॉर्म देणार देण्यात येणार असल्याचे सांगून म्हेत्रे म्हणाले, ही निवडणूक अत्यंत पारदर्शपणे पार पाडण्यासाठी प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे. यामध्ये त्यांनी आचारसंहिता कक्ष, एक खिडकी योजना, निवडणूक निरीक्षक, कंट्रोल मदत कक्ष, कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व दळणवळण, साहित्य वाटप व नियोजन, संगणक कक्ष, कार्यालयीन साहित्य वाटप पथक, भोजन व्यवस्था व प्रशिक्षण, लेखा शाखा, मतदान जनजागृती प्रचार प्रसार (स्वीप पथक), मतदान कर्मचारी, वैद्यकीय सहाय्यता व कल्याण पथक, माध्यम कक्ष, सहाय्यक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समन्वय कक्ष, सेक्टर ऑफिसर समन्वय, बीएलओ समन्वयक, ईव्हीएम यंत्रणा तसेच पत्रव्यवहार कक्ष स्थापन केले आहेत.
प्रचार प्रसारात कराड तालुका अव्वल.......
"कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी मतदारांमध्ये मतदान जनजागृती व्हावी या उद्देशाने बाईक रॅली व भव्य रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला. याची सुरुवात राज्यात प्रथमच कराड तालुक्यातून झाली याचा सार्थ अभिमान आहे."
- अतुल म्हेत्रे - प्रांताधिकारी कराड
#KaradElection2025 #KaradMunicipalElection #AtulMhetre #KaradNews #ChangbhalaNews #SataraDistrict #ElectionPreparation #KaradPrantAdhikari #KaradNivadnuk #MunicipalElection2025 #KaradAdministration #SataraNews #ElectionTraining #KaradUpdates #MaharashtraElections

0 टिप्पण्या