कराड, दि. १० नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज म्हणजे सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे मात्र सोमवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक कक्षातून देण्यात आली आहे.
कराड नगरपालिका निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. १५ प्रभागातून ३१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. दि. १० नोव्हेंबरपासून १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज तथा नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत. १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, २५ नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे . त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.
मतदान २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.
दरम्यान, मलकापूर नगरपालिकेसाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मलकापूर नगर परिषदेसाठी ही २ डिसेंबर रोजी मतदान होत असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
#KaradElection2025 #KaradMunicipalCorporation #MalakapurMunicipality #KaradPolitics #SataraNews #MaharashtraElections #ChangbhalaNews #KaradCity

0 टिप्पण्या