कराड, दि. ११ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड वनपरिक्षेत्रातील मौजे कासारशिरंबे-बेलवडे रोडवर रात्रगस्त करताना पहाटे ५ वाजताच्या दरम्यान वन्यप्राणी रानडुकराची अवैध तस्करी करणारे ९ संशयीत आरोपी अटक करण्यात आले आहेत.
माहिती मिळाल्यानंतर, वनकर्म्यांनी वाहन क्र. MH१० DT ६६९६ तपासले असता, गाडीमध्ये जिवंत रानडुकर – ७,, शिकारीसाहित्य, वाघर, गॅस साहित्य, आणि शिकारी पाळीव कुत्री – ३ आढळली.
अटक केलेले संशयीत आरोपीं याप्रमाणे:
सोमनाथ बबन आडके, रा. कासारशिरंबे, ता. कराड
अमोल मारूती माने, रा. कासारशिरंबे, ता. कराड
सचिन हणमंत क्षिरसागर, रा. कासारशिरंबे, ता. कराड
सागर तानाजी यलमारे, रा. कासारशिरंबे, ता. कराड
गणेश नामदेव नंदीवाले, रा. जयसिंगपुर, ता. शिरोळ
योगेश रघुनाथ कुंभार, रा. मानकापुर, ता. चिकोडी
अमोल गुंडाजी नंदीवाले, रा. कोथळे, ता. शिरोळ
अमित संजय आडके, रा. कासारशिरंबे
दत्तात्रय धोंडीराम ढोणे, रा. पलुस, ता. पलुस
चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की, सदर वन्यप्राणी रानडुकर मौजे राजेगाव व गव्हाणधडी ता. माजलगाव जि. बीड येथून आणले आहेत.
अटक केलेला सर्व संशयितांना दि.११ नोव्हेंबर रोजी मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चार दिवसांची वनकोठडी सुनावली.
सदर प्रकरण वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम विविध कलमांतर्गत गुन्हा असून, आरोपींना ३ वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा १ लाख रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कराड वनपरिक्षेत्रातील लोकांना वन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की– वन्यप्राणी शिकार, अवैध वाहतूक, राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण आणि वुक्षतोड हे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये वनविभागाकडून कडक कारवाई केली जाईल.
रानडुक्कर शिकारी प्रकरणी केलेली कारवाई ही श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) उपवनसंरक्षक, सातारा वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये श्रीमती जयश्री जाधव सहा. वनसंरक्षक (वनी व कॅम्पा), श्रीमती ललिता पाटील वनक्षेत्रपाल (प्रा.) कराड, रोहन भाटे मानद वन्यजीव रक्षक, दिलीप कांबळे वनपाल कोळे,
आनंद जगताप वनपाल मलकापूर, दशरथ चिट्टे वनरक्षक कासारशिरंबे, अभिनंदन सावंत वनरक्षक कोळे, कविता रासवे, वनरक्षक तांबवे, अजय महाडीक, रोहित कुलकर्णी – रेस्क्यू टीम यांचा सहभाग होता. पुढील तपास श्रीमती ललिता पाटील, वनक्षेत्रपाल (प्रा.) कराड करत आहेत.
#Karad #WildlifeCrime #RaanDukar #ForestDepartment #SataraNews #ChangbhalaNews #WildlifeProtection #IllegalHunting #वन्यप्राणी #रानडुकर #वनकोठडी #वन्यजीवसंरक्षण


0 टिप्पण्या