🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मलकापूर नगरपरिषद निवडणूक 2025: नगराध्यक्ष आणि सर्व प्रभागांमध्ये चिन्ह वाटप जाहीर

मलकापूर नगरपरिषद भवनाचा फाइल फोटो


मलकापूर - कराड, दि. २६ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा

मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाचे तसेच सर्व प्रभागांतील उमेदवारांना अधिकृत चिन्ह वाटप करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासह 11 प्रभागांतील उमेदवारांची अंतिम चिन्ह यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांना चिन्ह देण्यात आली. आर्यन सविनय कांबळे यांना घड्याळ, अक्षय संदीप मोहिते यांना धनुष्यबाण तर तेजस शेखर सोनावले यांना कमळ हे चिन्ह देण्यात आले.
प्रभाग 1 मध्ये 1अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव) मध्ये कांचन सारंग लोहार यांना घड्याळ, अश्विनी मोहन शिंगाडे यांना कमळ आणि रब्बाना हिना अझरुद्दीन शेख यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. 1ब (सर्वसाधारण) मध्ये नितीन विष्णुपंत काशीद पाटील यांना मशाल आणि प्रशांत शिवाजी चांदे यांना कमळ हे चिन्ह जाहीर झाले.


प्रभाग 2 मधील 2अ (सर्वसाधारण महिला राखीव) मध्ये गीतांजली शहाजी पाटील यांना कमळ आणि विजया प्रताप सूर्यवंशी यांना कपबशी हे चिन्ह मिळाले. 2ब (सर्वसाधारण) मध्ये विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश रैनाक यांना कमळ तर भीमाशंकर इराप्पा माऊर यांना नारळ हे चिन्ह देण्यात आले.


प्रभाग 3 मधील 3अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव) मध्ये हणमंत कृष्णत पुजारी यांना हात आणि धनंजय शामराव येडगे यांना कमळ हे चिन्ह मिळाले. 3ब (सर्वसाधारण महिला राखीव) येथे बिनविरोध निवड झाली आहे.


प्रभाग 4 मधील 4अ (अनुसूचित जाती राखीव) येथेही बिनविरोध निवड झाली आहे. 4ब (सर्वसाधारण महिला राखीव) मध्ये कल्पना नारायण रैनाक यांना कमळ तर आनंदी मोहन शिंदे यांना घड्याळ हे चिन्ह देण्यात आले.


प्रभाग 5 मधील 5अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव) मध्ये मृणालिनी अमर इंगवले यांना घड्याळ आणि शुभांगी दिगंबर माळी यांना कमळ हे चिन्ह जाहीर झाले. 5ब (सर्वसाधारण) मध्ये राजेंद्र प्रल्हाद यादव (आबा) यांना कमळ आणि दादा बाबू शिंगण यांना घड्याळ हे चिन्ह देण्यात आले.


प्रभाग 6 मधील 6अ (अनुसूचित जाती महिला राखीव) मध्ये काजल अक्षय माने यांना घड्याळ आणि सीमा बाळासाहेब सातपुते यांना कमळ हे चिन्ह मिळाले. 6ब (सर्वसाधारण) मध्ये संदीप बबन मुटल यांना घड्याळ आणि सुरज शंकर शेवाळे यांना कमळ हे चिन्ह वाटप झाले.


प्रभाग 7 मधील 7अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव) आणि 7ब (सर्वसाधारण) दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे.
प्रभाग 8 मधील 8अ (अनुसूचित जाती महिला राखीव) मध्ये छाया हणमंत भोसले यांना घड्याळ आणि गीता नंदकुमार साठे यांना कमळ हे चिन्ह मिळाले. 8ब (सर्वसाधारण) मध्ये सागर हणमंत जाधव पाटील यांना घड्याळ, शरद उमाकांत पवार यांना कमळ आणि अक्षय दादासो पाटणकर यांना धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले.


प्रभाग 9 मधील 9अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव) आणि 9ब (सर्वसाधारण महिला राखीव) येथे बिनविरोध निवड झाली आहे.
प्रभाग 10 मधील 10अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव) मध्ये प्रशांत विजय पोतदार यांना घड्याळ आणि प्रमोद माणिकराव शिंदे यांना कमळ हे चिन्ह मिळाले. 10ब (सर्वसाधारण महिला राखीव) मध्ये स्वाती रणजीत थोरात यांना कमळ तर स्नेहल सत्यवान पाटील यांना घड्याळ हे चिन्ह देण्यात आले.


प्रभाग 11 मधील 11अ (सर्वसाधारण महिला राखीव) मध्ये राजश्री नितीन जगताप यांना कमळ, वैशाली वैभव पाटील यांना गॅससिलेंडर आणि छाया अर्जुन येडगे यांना कपबशी हे चिन्ह जाहीर झाले. 11ब (सर्वसाधारण) मध्ये अनुराज शंकर थोरात यांना नारळ आणि मनोहर भास्करराव शिंदे यांना कमळ हे चिन्ह देण्यात आले.
संपूर्ण शहराचे लक्ष आता मलकापूरमधील या निवडणूक लढतीकडे लागले असून, चिन्ह वाटपानंतर प्रचारयुद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

#MalkapurElection2025 #MalkapurNagarparishad #ChangbhalaNews #MalkapurUpdates #MunicipalElection #PoliticalNews #MaharashtraPolitics #Nivdhanuk2025

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या