कराड , दि. २६ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाचे ९ व १ ते १५ प्रभागातील एकूण १०९ उमेदवारांना निवडणूक निरीक्षक श्रीमती ज्योती कावरे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी अधिकृत चिन्ह वाटप केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते.
कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025
नगराध्यक्ष पदाच्या ९ उमेदवारांचे चिन्ह वाटप पुढील प्रमाणे-
झाकीर पठाण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) - हात
विनायक पावसकर (भाजपा) - कमळ
इम्रान मुल्ला (बसपा) - हत्ती
राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी) - नारळ
रणजीत पाटील (अपक्ष) - हीरा
गणेश कापसे (अपक्ष) - रोड रोलर
श्रीकांत घोडके (अपक्ष) - बॅट
शरद देव (अपक्ष) - कपबशी
बापू लांडगे (अपक्ष) - गॅस सिलेंडर
१०९ नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे चिन्ह वाटप असे :
प्रभाग १ अ - सुरेखा काटकर - कमळ, रूपाली माने - छत्री.
प्रभाग १ ब - संजय कांबळे - कमळ, हूमेरा शेख - हात, जयवंत पाटील - छत्री.
प्रभाग २ अ - भाग्यश्री साळुंखे - कमळ, नीलम कदम - छत्री, पद्मजा लाड - कोट.
प्रभाग २ ब समीर करमरकर - कमळ, सुहास पवार - छत्री.
प्रभाग ३ अ - निकहत नदाफ - हात, कश्मिरा इंगवले - घड्याळ, रजिया आंबेकरी - छत्री, सारिका देशमुख - शिट्टी, रजनी पवार - कॅमेरा.
प्रभाग ३ ब - जावेद शेख - हात, साहेबराव शेवाळे - घड्याळ, प्रवीण पवार - छत्री, संकेत पवार - लिफाफा, रियाज मुजावर - शिट्टी, सागर लादे - चालण्याची काठी, दाऊद सय्यद - छताचा पंखा.
प्रभाग ४ अ - शैला पाटील - सूर्यफूल, स्वाती मोहिते - कमळ, प्रियांका यादव - नारळ.
प्रभाग ४ ब - आनंद लादे - हात, शिवाजी रामूगडे - कमळ, अर्चना ढेकळे - नारळ.
प्रभाग ५ अ - रेवती बर्गे - कमळ, अर्चना पाटील - हात, अरुणा पाटील - छत्री, मिनाज सुतार - ऑटो रिक्षा.
प्रभाग ५ ब - योगेश लादे - हात, शुभम लादे - कमळ, राजेंद्र कांबळे - एअर कंडिशनर, राहुल भोसले - छत्री.
प्रभाग ६ अ - शारदा माने - कमळ, वहिदा इनामदार - कपाट, सानिया मुतवल्ली - छताचा पंखा, साजिदा मुल्ला - नारळ.
प्रभाग ६ ब - सुनील व्हावळ - कमळ, राहील मुतवल्ली - सफरचंद, अल्ताफ शिकलगार - नारळ.
प्रभाग ७ अ - अंजली कुंभार - कमळ, प्रिया आलेकरी - लहान मुलाचा चालायचा गाडा, वंदना गायकवाड - फुगा, तेजश्री पाटसकर - टोपली.
प्रभाग ७ ब - अजय पावसकर - कमळ, विद्या मोरे - पेनाची नीप, अजय कुलकर्णी - फलंदाज, मन्सूर खैरतखान - विजेरी (टॉर्च), जयंत बेडेकर - छत्री, विनायक मोहिते - मण्यांचा हार.
प्रभाग ८ अ - किशोरी शिंदे - कमळ, सुनीता साळुंखे - धनुष्यबाण, देवयानी डुबल - नारळ,
प्रभाग ८ ब - विजय वाटेगावकर - कमळ, संजय चन्ने - नारळ.
प्रभाग ९ अ - मिनाज पटवेकर - छत्री, शमीम बागवान - शिट्टी.
प्रभाग ९ ब - समीर पटवेकर - हात, आशुतोष जाधव - शिट्टी, प्रताप साळुंखे - छत्री.
प्रभाग १० अ - मनीषा मुळे - कमळ, आशा मुळे - नारळ.
प्रभाग १० ब - सुमित जाधव - कमळ, प्रताप इंगवले - पट्टा, मोहसीन कागदी - नारळ, नागेश कुरले - बाकडे (बेंच), यशराज सुर्वे - छत्री.
प्रभाग ११ अ - सुदर्शना थोरवडे - हात, वैष्णवी वायदंडे - कमळ, माया भोसले - नारळ, शुभांगी भोसले - सायकल पंप.
प्रभाग ११ ब - अक्षय सुर्वे - हात, गणेश पवार - कमळ, अजित भोसले - ऑटो रिक्षा, योगेश वेल्हाळ - बिस्किट, पुनम धोतरे - दुर्बीण.
प्रभाग १२ अ - स्मिता धोत्रे - कमळ, रुकैया मुलाणी - हात, अनिता पवार - नारळ, तेजस्विनी कुंभार - फळा,
प्रभाग १२ ब - शाहरुख शिकलगार - हात, वीरेंद्र गुजर - कमळ, गणेश कापसे - किटली, श्रीकांत घोडके - हॅट, विजय यादव - नारळ, जय सूर्यवंशी - होडी.
प्रभाग १३ अ - स्मिता हुलवान - कमळ, कीर्तीका गाढवे - नारळ.
प्रभाग १३ ब - आशुतोष डूबल - कमळ, अमरजीत राजापुरे - हात, सिद्धांत पाटील - पुस्तक, राकेश शाह - छत्री.
प्रभाग १४ अ - वर्षा वास्के - कमळ, प्रियांका भोंगाळे - छत्री.
प्रभाग १४ ब - शिवाजी पवार - कमळ, इंद्रजीत भोपते - नारळ, किरण सूर्यवंशी - धनुष्यबाण.
प्रभाग १५ अ - पुनम घेवदे - कमळ, दया गायकवाड - पेटी, योगिता जगताप - छत्री.
प्रभाग १५ ब - विश्वनाथ फुटाणे - कमळ, अख्तरहुसेन आंबेकरी - छत्री, नईम पठाण - ब्रेड टोस्टर,
प्रभाग १५ क - हसीना मुल्ला - हात, संगीता शिंदे - कमळ, सुप्रिया खराडे - छत्री.
संपूर्ण शहराचे लक्ष आता कराडमधील या निवडणूक लढतीकडे लागले असून, चिन्ह वाटपानंतर प्रचार मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
#KaradElection2025 #KaradNagarParishad #KaradMunicipalElection #KaradNews #ChangbhalaNews #KaradPolitics #MaharashtraElections #KaradNagarsevak #KaradNagarsevakList #KaradNivadnuk2025 #KaradNagarsevakChinhwatan #ElectionNews #PoliticalNews #KaradCity #SataraDistrictNews #MaharashtraPoliticalNews


0 टिप्पण्या