🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडला ‘क्रीडानगरी’ बनवण्याचा संकल्प! आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा निर्धार ; २४४ कोटींच्या विकासकामांचा धडाका

 

भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले कराडमध्ये कोपरा सभेत भाषण करताना

कराड : भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले


कराड, दि. २६ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा

कराड शहराला ‘क्रीडानगरी’ म्हणून घडविण्याचा माझा ठाम संकल्प असून, त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मोठा निधी आणण्याचा निर्धार आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कराड नगरपालिका निवडणूीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेत आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते.


भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर, तसेच प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवार सुरेखा काटकर आणि संजय कांबळे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती.

भोसले म्हणाले, “केंद्रात व राज्यात भाजप महायुतीचे सरकार असल्याने कराड शहराचा सर्वांगीण विकास वेगाने होण्याची मोठी संधी आहे. कराडच्या पायाभूत सुविधांसाठी आतापर्यंत २४४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामध्ये स्मशानभूमी विकास, ओपन स्पेस विकास, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंती यांसारख्या अत्यावश्यक कामांचा समावेश आहे.”


कराडला क्रीडा क्षेत्रात मोठी परंपरा लाभल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, “ऑलिम्पिक पदकवीर पहलवान खाशाबा जाधव यांनी कराडची कीर्ती जागतिक पातळीवर नेली. त्याच प्रेरणेने कराडला ‘क्रीडा नगरी’चा मानाचा मुकूट मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे.”
भाजपाचे सर्व उमेदवार लोकाभिमुख, अनुभवी आणि शहराच्या समस्या जाणणारे असल्याने कराडच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागांतील भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.


सभेत विनायक पावसकर आणि संजय कांबळे यांनीही कराडच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला बहुमत देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक राजेंद्र माने, संग्राम घोलप, इंद्रजीत घोलप, गणेश काटकर, विश्वजीत दसवंत, बजरंग दसवंत, महेश जाधव, विलास काटकर, रविराज शिंदे, पंकज पावसकर, किरण इनामदार, संदीप जोशी, जगन्नाथ जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#KaradElection2025 #KaradMunicipalElection #AtulBhosale #VinayakPawasakar #KaradKridangari #ChangbhalaNews #KaradDevelopment #BJPKarad #Mahayuti #KaradSportsCity #KaradVikas

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या