कराड प्रतिनिधी | दि. २५ नोव्हेंबर २०२५
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगम, कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, कराडचे यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
#YashwantraoChavan #यशवंतरावचव्हाण #पुण्यतिथी #SupriyaSule #सुप्रियासुळे #NCPSharadPawar #राष्ट्रवादीशरदपवार #Karad #कराड #PritiSangam #महाराष्ट्र #MaharashtraPolitics #आधुनिकमहाराष्ट्राचे शिल्पकार

0 टिप्पण्या