🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कोअर कमिटीचा निर्णय अंतिम; ‘फसवणूक’ आरोपांचे आ. अतुल भोसले यांचेकडून खंडन : काँग्रेसवर थेट प्रहार — ‘त्यांची स्वतःचीच स्थिती डळमळीत’

 

कराड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा प्रीतिसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करून शुभारंभ करताना आमदार अतुल भोसले

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा जोर वाढत असताना, भाजपने आपल्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत केला. यावेळी उमेदवार निवडीपासून ते विरोधकांच्या भूमिकेपर्यंत अनेक मुद्द्यांवर भोसले यांनी स्पष्ट भूमिका मांडत, “पक्षात कोअर कमिटीचा निर्णयच अंतिम असून कोणाची फसवणूक करण्याचा प्रश्नच येत नाही,” असा ठाम निर्वाळा दिला.
विधानसभा निवडणूकीत माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी मदत केल्याची कबुली देताना भोसले म्हणाले,
“नगराध्यक्षपदासाठी १८ जण इच्छुक होते. आमदार म्हणून मी कोणालाही शब्द दिला नाही. कोअर कमिटीने अनुभवी नेत्याला उमेदवारी दिली. त्यामुळे कुणाची फसवणूक झालेली नाही.”
प्रचार शुभारंभावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर, बंडाकाका डूबल, अरुण जाधव, शारदा जाधव, अतुल शिंदे, इंद्रजीत गुजर, भाग्यश्री साळुंखे, स्मिता हुलवान आदी मान्यवर उपस्थित होते.


मलकापूरमधील बिनविरोध निवडीने ‘भाजपचे मनोबल उंच’....
माध्यमांशी बोलताना भोसले म्हणाले,
“मलकापूरमध्ये भाजपचे पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आले ही आमच्या कामाची पावती आहे. उर्वरित जागांवरही आमचे उमेदवार विजयी होतील.”
त्यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की,
“यंदा कराडमध्ये मोठे यश मिळेल.कराडचा नगराध्यक्षही भाजपचा असेल

काँग्रेसवर थेट प्रहार — ‘त्यांची स्वतःचीच स्थिती डळमळीत’....
काँग्रेसचे आव्हान कितपत जाणवते, असा प्रश्न विचारला असता भोसले म्हणाले,
“काँग्रेस नगरपालिका निवडणुकीत उभी राहणार की नाही याचीच शंका वाटते. एक गट लढणार, दुसरा नाही – अशी परिस्थिती आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भावालाही अर्ज भरू दिला नाही, हा अंतर्गत विसंवादाचा नमुना आहे.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपा समोर मुख्यतः लोकशाही आघाडी, यशवंत विकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गट यांचेच आव्हान असणार आहे.


३५ वर्षांची निष्ठा — पावसकर उमेदवारी ‘न्याय्य’....

विनायक पावसकर यांच्याबाबत बोलताना भोसले म्हणाले,
“गेल्या ३५ वर्षांत पावसकर यांनी पक्षासाठी अथक परिश्रम घेतले. कठीण काळातही त्यांनी भाजपचा झेंडा बुलंद ठेवला. त्यांच्या अनुभव आणि निष्ठेचा सन्मान म्हणून त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली.”

कराडसाठी ‘मेगाप्लॅन’ प्रगतिपथावर...
कराड शहरातील विकासकामांबाबत भोसले म्हणाले की—
उपजिल्हा रुग्णालय अत्याधुनिक करणे
ट्रामा केअर सेंटर व रीड डेव्हलपमेंट
रस्ते, वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा सुधारणा
प्रीतीसंगम बाग री डेव्हलपमेंट
नेकलेस रोड प्रकल्प
नदीकाठ संरक्षण भिंत बांधणी

या सर्वांचा समावेश असलेला मेगाप्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असून प्रस्ताव प्रगतिपथावर आहे.

‘जुने–नवे कार्यकर्ते एकत्र’ — 42 वर्षांची दरी भरून काढण्याचा प्रयत्न....

भोसले म्हणाले,
“मनोहर शिंदे आणि अशोकराव थोरात यांना ४२ वर्षांनी एकत्र आणले. मलकापूर आणि कराड—दोन्हीकडे नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मलकापुरात आधुनिक मलकापूर हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

#KaradMunicipalElection #AtulBhosale #KaradPolitics #BJPKarad #KaradNivadnuk2025 #VinayakPawaskar #KaradMalkapur #ChangbhalaNews #PoliticalNews #MaharashtraPolitics

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या