🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ | सुधारित मतदार यादी कार्यक्रम जाहीर

 

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ साठी सुधारित मतदार यादी जाहीर
Photo - Changbhala-News

सातारा | चांगभलं वृत्तसेवा

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

 यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख 3 नोव्हेंबर 2025 होती. तसेच निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील अंतिम मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख 3 नोव्हेंबर 2025 होती. मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख 12 नोव्हेंबर 2025 आहे.

यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार यादी सातारा जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये त्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील पंचायत समिती मधील ज्या त्या गट व गणनिहाय यादी दि.3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. दि. 3 नोव्हेंबरपासून गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या कार्यालयीन वेळेत तहसिलदार कार्यालयामध्ये सर्व सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेल्या आहेत. तर मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली.

#ChangbhalaNews #SataraZPElection #PanchayatSamitiElection2025 #VoterList #SataraDistrict #ElectionUpdate #महाराष्ट्रनिवडणूक२०२५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या