🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

साताऱ्यात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 'या' पिकांसाठी हमीभावाच्या दराने खरेदी नोंदणी ३१ डिसेंबरपर्यंत होणार

नाफेड आणि सहकारी संस्थांमार्फत सातारा जिल्ह्यात मूग, उडीद व सोयाबीन खरेदी नोंदणी सुरू | शेतकरी नोंदणी प्रक्रिया २०२५-२६ | Changbhala News Satara Agriculture Update
Changbhala-News

सातारा | चांगभलं वृत्तसेवा — सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड (NAFED) यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ साठी मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला आधारभूत दर मिळावा यासाठी नाफेडमार्फत जवळच्या खरेदी केंद्रावर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील फलटण, वाई, कराड आणि कोरेगाव तालुक्यांतील सहकारी संस्था केंद्रांवर शेतकरी ७/१२ उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकसह नोंदणी करून घेऊ शकतात.


शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ मध्ये निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेडच्या नजीकच्या केंद्रावर मूग, उडिद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दिनांक दि.३१ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी मूग खरेदीसाठी रु. ८०७८ प्रति क्विंटल, उडीद खरेदीसाठी ७८०० प्रति क्विंटल व सोयाबीन खरेदीसाठी रु.५३२८ प्रति क्विंटल खरेदीकरीता आधारभुत दर निश्चित केले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.

हंगाम २०२५-२६ मध्ये सातारा जिल्ह्यात फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड फलटण, वाई तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड वाई, कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड कराड, मसुर नं.२ विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड.का.से.सह. सोसायटी लि. मसुर, कोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड कोरेगाव येथे नाफेडने खरेदी केंद्रे निश्चित केली आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मुग, उडिद, व सोयाबीन विक्रीकरीता आपल्या गावाजवळील नाफेड च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जावुन ७/१२ उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवून प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने पीओएस मशिनव्दारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालु वर्षाचा ७/१२ उतारा पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी धान्य वाळवून, स्वच्छ करून काडीकचरा नसलेले, आद्रता १२% च्या आत असलेले विक्रीसाठी आणणे अनिवार्य आहे. तसेच खरेदीकरीता आपणास SMS प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवुन यावा. असेही आवाहन श्री. सुद्रिक यांनी केले आहे.

#ChangbhalaNews #SataraNews #NaFED #FarmerRegistration #SoybeanPurchase #MoongPurchase #UdidPurchase #SataraSheti #MaharashtraAgriculture #KaradNews #WaiNews #PhaltanNews #KoregaonNews #ShetiBaatmi #AgricultureUpdate #MSP2025 #FarmersFirst #चांगभलंन्यूज 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या