🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

भाजपला थेट आव्हान! कराड नगरपरिषदेच्या रणांगणात काँग्रेस सज्ज; स्वबळाची तयारी, आघाडीची चर्चाही गतिमान

कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक पाटण कॉलनी येथे पार पडली

कराड, दि. ७ नोव्हेंबर, चांगभलं वृत्तसेवा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण कॉलनी येथील निवासस्थानी कराड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऍड. अमित जाधव, माजी अध्यक्ष ऋतुराज मोरे, माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, जेष्ठ नेते विठ्ठलराव शिखरे, माजी नगरसेवक अशोक कोळी, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे, श्रीकांत मुळे, हणमंत घाडगे, पै. अक्षय सुर्वे, ज्ञानदेव राजापूरे, विश्वाजीत दसवंत, साहेबराव शेवाळे, नितीन ओसवाल, जितेंद्र ओसवाल, सुनील शिंदे, शरद गाडे, इरफान सय्यद, डॉ. मधुकर माने, ऍड. इरशाद खैरतखान, विक्रम देशमुख, योगेश लादे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील विविध प्रभागांतील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीस सहभागी झाले होते.
“स्वबळाची तयारी, पण आघाडीचाही विचार” – शिवराज मोरे
शिवराज मोरे म्हणाले, “कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष स्वबळावर सज्ज आहे; मात्र, महाविकास आघाडीसोबत जाण्याचाही पर्याय खुला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम रणनिती ठरवली जाईल.”
बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याची मागणी केली.
“चव्हाण कुटुंबाने सेवाभावाने राजकारण केले” – इंद्रजीत चव्हाण
इंद्रजीत चव्हाण म्हणाले, “कराड शहराने आमच्या चव्हाण कुटुंबावर नेहमीच प्रेम दाखवले आहे. आमचे मार्गदर्शक पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तेसाठी नव्हे तर जनसेवेसाठी राजकारण केले. त्यांच्या काळात काँग्रेसने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.”
यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवरही तीव्र टीका केली.
“जनतेचा विश्वास काँग्रेससोबतच” – झाकीर पठाण
झाकीर पठाण म्हणाले, “कराड शहरातील मतदारांनी नेहमी काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. आगामी निवडणुकीतही काँग्रेसच विजयी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


“भाजपचा पराभव करण्याची ताकद काँग्रेसकडेच” – ऍड. अमित जाधव
ऍड. अमित जाधव म्हणाले, “काँग्रेस हा सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात कराड शहरात झालेली विकासकामे हीच आमची निवडणूक शक्ती आहे. भाजपचा पराभव करण्याची ताकद केवळ काँग्रेसकडेच आहे.”
बैठकीच्या शेवटी राहुल चव्हाण, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, इरफान सय्यद, शरद गाडे, अक्षय सुर्वे, अमित माने यांसह अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली मते मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. नरेंद्र चिंगळे यांनी केले, तर आभार जितेंद्र ओसवाल यांनी मानले.

#KaradNews #CongressKarad #PrithvirajChavan #KaradMunicipalElection #MVA #ChangbhalaNews #ShivrajMore #IndrajeetChavan #AmitJadhav #ZakirPathan #KaradPolitics #MaharashtraPolitics

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या