घरनिकी, दि. २७ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
भारतीय संविधान दिनाच्या (२६ नोव्हेंबर) औचित्याने घरनिकी (ता. आटपाडी) गावात बौद्ध विकास मंडळ घरनिकी व ग्रामस्थ यांच्यावतीने ग्रामपंचायत घरनिकी यांना संविधान प्रत भेट देण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आप्पासो पवार, क्लार्क बाबू तोरणे, तसेच आर.पी.आय. (आ) कलाकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनिल भाऊ तोरणे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी तोरणे यांचा समावेश होता.
यावेळी ग्रा. सदस्य भीमराव कदम, शिवाजी खैरमोडे, महादेव कदम, बनसोडे मिस्त्री, सुरेंद्र कदम, संजय कदम, शिवाजी कदम, दिनकर कदम, सुनील कदम, राजेंद्र कदम, बापू साबळे, नंदा खैरमोडे, वैशाली खैरमोडे, सुमल तोरणे तसेच इतर मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून संविधान प्रत भेट उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ग्रामसभेच्या माध्यमातून संविधानाची मूल्ये, अधिकार व कर्तव्ये यांची जाणीव सर्व नागरिकांना व्हावी हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
#ConstitutionDay2025
#संविधानदिन
#GharanikiNews
#ChangbhalaNews
#BuddhistDevelopmentBoard
#KaradUpdates
#SataraDistrict
#GramPanchayatNews
#SocialInitiative
#OathToConstitution
#DrAmbedkarThoughts
#लोकशाही



0 टिप्पण्या