🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मलकापुरात काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी-मित्र पक्षांच्या आघाडीसोबत ; उंडाळकरांनी जाहीर केले १६ उमेदवार ; एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची

 

मलकापूर नगरपालिका निवडणूक 2025 – राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस व समविचारी पक्षांची महाआघाडी; १६ उमेदवारांची घोषणा


कराड, दि. २२ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा


मलकापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि इतर समविचारी पक्ष व संघटनांची महत्त्वाची आघाडी शेवटच्या क्षणी उभी राहिली. सुरुवातीपासून काँग्रेसने स्वतंत्र लढाईची भूमिका घेतल्याने निर्माण झालेला तिढा मोठा होता. अनेक प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित करता येत नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी झालेल्या चर्चांच्या फेऱ्यांनंतर तडजोडीचा मार्ग मोकळा झाला आणि महाआघाडीने मिळून एकूण सोळा उमेदवार मैदानात उतरविले, असल्याची घोषणा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते एॅडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

उंडाळकर यांनी सांगितले की, काँग्रेससोबत आघाडी शेवटच्या दिवशी जुळली. सुरुवातीपासून काँग्रेसची वेगळे लढण्याची भूमिका असल्याने काही जागांवर उमेदवार देता आले नाहीत. तरीही वेळेत समविचारी पक्षांना एकत्र करून शेवटी सोळा उमेदवार देणे शक्य झाले. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. काहीजणांनी आम्ही नाराजांना सोबत घेत आहोत, अशी टीका केली; परंतु नाराजांना आम्ही सोबत घेतले असले तरी त्यांच्यासारखी कोणालाही थेट उमेदवारी दिलेली नाही.

भाजपविरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा पुढाकार राष्ट्रवादीने घेतल्याचे सांगताना उंडाळकर म्हणाले. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार मानणाऱ्या, पुरोगामी विचार मानणाऱ्या पक्षांनी आमचा प्रस्ताव स्वीकारला. काँग्रेसने विलंब केला नसता तर काही रिकाम्या राहिलेल्या जागांसाठीही उमेदवार देता आले असते, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. मलकापूरात भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याबाबत ते म्हणाले की, त्या जागांवर इतर पक्षांचे उमेदवार देता न आल्यानेच ते बिनविरोध झाले. तर शेवटच्या क्षणी आणखी एका उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांचा आणखी एक उमेदवार बिनविरोध झाला.
पण आम्ही नगराध्यक्षपदा सह जे १६ उमेदवार दिले आहेत, ते विकासाचे व्हिजन असणारे, उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सक्षम उमेदवार आहेत.

अजितराव पाटील यांची मनोहर शिंदे यांच्यावर सडकून टीका..

या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितराव पाटील चिखलीकर यांनी मनोहर शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर सडकून टीका केली. काँग्रेस पक्षाने त्यांच्या कुटुंबाला मोठे स्थान दिले. त्यांच्या वडिलांना दोनदा विधान परिषदेची आमदारकी दिली. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना आजवर मोठी मदत केली. तरीही चव्हाण यांच्या वयाच्या या टप्प्यावर त्यांनी स्वार्थासाठी पक्ष सोडला, हे आक्षेपार्ह असल्याचे चिखलीकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या आणि याबाबतची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांना आपण दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

चिखलीकरांनी विधानसभा निवडणुकीतील शिंदे यांच्या ढिसाळ कामगिरीचा मुद्दा उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेससाठी काम केले नाही. केले असते तर मलकापुरात चार हजार मते कमी का पडली? याचे उत्तरही त्यांनी द्यावे, असे ते म्हणाले. सध्या संक्रमणकाळ असला तरी आम्ही निष्ठावंत आहोत, तत्त्वनिष्ठा जपतो, त्यामुळे कोणाच्याही वळचणीला जाणार नाही.


मलकापूरातील विकासकामे पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून झाली असून विरोधक फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत आहेत, अशी टीकाही चिखलीकर यांनी केली.
उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार असून शाश्वत विकासाचा मुद्दा जनतेसमोर ठळकपणे मांडू, असेही चिखलीकर म्हणाले.

यावेळी राजेश देसाई यांनी सांगितले की, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी आर्यन कांबळे हे उमेदवार असतील. तसेच समविचारी पक्ष व आघाड्यांकडून एकत्रितपणे एकूण सोळा उमेदवार नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरले आहेत.
या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील वाठारकर, सुनील पाटील, रयत संघटनेचे प्रा काटकर, राष्ट्रीय काँग्रेसचे इंद्रजीत चव्हाण, नामदेवराव पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, शेवटच्या टप्प्यात उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट, तसेच समविचारी पक्ष व संघटनांना एकत्र केल्याने सुरुवातीपासून भाजपसाठी एकतर्फी वाटणारी मलकापूरची निवडणूक रंगतदार वळणावर पोहोचवली आहे.


अजितराव पाटील चिखलीकर – भाषणातील मुख्य मुद्दे

- मनोहर शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर टीका...
- काँग्रेसने त्यांच्या कुटुंबाला मोठे स्थान दिले, तरीही त्यांनी पक्ष का सोडला?
- त्यांच्या वडिलांना काँग्रेसने दोन वेळा विधान परिषद आमदारकी दिली.
- पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना राजकीय पटलावर खूप मदत केली, तरीही त्यांच्या वयाच्या या टप्प्यावर त्यांनी स्वार्थासाठी काँग्रेस सोडली.
- लोकसभा निवडणुकीपासून त्यांची पक्ष सोडण्यासाठी हालचाल सुरू होती; याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांना आपण आधीच कल्पना दिली होती.


विधानसभा निवडणुकीतील भूमिकेवर चिखलीकरांकडून प्रश्नचिन्ह -
- विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेससाठी काम केले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
- मलकापूरात चार हजार मते कशी कमी पडली याचे उत्तर त्यांनी द्यावे.

निष्ठा आणि तत्त्वनिष्ठा महत्वाची -
- संक्रमणकाळ असला तरी आम्ही निष्ठावंत आहोत.
- प्रलोभनासाठी किंवा स्वार्थासाठी आम्ही तत्त्वनिष्ठा सोडणार नाही, कोणाच्याही वळचणीला जाणार नाही.

विकासाचा मुद्दा -
- मलकापूरातील सर्व विकासकामे पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून झाली आहेत आणि ती दिसून येतात.
- विरोधक फक्त आश्वासने देत आहेत — निधी आणू, निधी देऊ असे ‘गाजर’ दाखवत आहेत.

निवडणूक रणनीती-
- उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही मलकापूरात घराघरातील मतदारांपर्यंत जाणार आहोत.
- काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ( उबाठा ) महाआघाडीच्या संयुक्त नेतृत्वाला जनतेचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास अजितराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.



#मलकापूरनिवडणूक
#मलकापूरमहाआघाडी
#NCPAjitPawarGroup
#CongressNCPAlliance
#UdaysinghPatilUndalkar
#AjitraoChikhlikar
#PrithvirajChavan
#MalkapurPolitics
#ChangbhalaNews
#MaharashtraElections2025
#MunicipalElections
#PoliticalUpdates


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या