🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

न्यायालयीन डिजिटल परिवर्तनातील शिलेदार : मास्टर ट्रेनर ॲड. विशाल एस. कुलकर्णी

 

Judicial digital transformation master trainer Adv Vishal S Kulkarni guiding advocates on e-Courts services in Karad

कराड- मलकापूर प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


भारतीय न्यायव्यवस्थेतील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने उचललेले पावले ही काळाची गरज बनली आहेत. माहिती व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने न्यायालयीन प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, वेगवान व खर्चिकदृष्ट्या किफायतशीर व्हाव्यात, या उद्देशाने सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ई- कमिटीमार्फत ICT (National Policy and Action Plan for Implementation of Information and Communication Technology in Indian Judiciary) राबविण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत मास्टर ट्रेनर ॲड. विशाल एस. कुलकर्णी यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरत आहे.



मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार मा. जिल्हा व सत्र न्यायालय, कराड येथे विधिज्ञ व विधिज्ञांचे क्लार्क यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या e-Training कार्यक्रमात मास्टर ट्रेनर म्हणून ॲड. विशाल एस. कुलकर्णी यांनी अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल तांत्रिक ज्ञानासोबतच विषय मांडण्याची सहज, सोपी व प्रात्यक्षिकांवर आधारित शैली उपस्थित विधिज्ञांना विशेष लाभदायक ठरली.
ॲड. विशाल कुलकर्णी यांनी e-Courts Services App व अधिकृत वेबसाईट यांच्या माध्यमातून अकाउंट तयार करण्यापासून ते कोर्ट केसेसचे e-filing, कागदपत्रे अपलोड करणे, केसेसची सद्यस्थिती तपासणे, आदेश व तारखांची माहिती मिळवणे अशा सर्व बाबींचे टप्प्याटप्प्याने प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाबाबत मर्यादित अनुभव असलेल्या विधिज्ञांनाही सहज समजेल अशा भाषेत त्यांनी संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली, हे त्यांच्या प्रशिक्षणाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
न्यायालयीन कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढवून वकील, पक्षकार व न्यायालयीन यंत्रणा यांचा वेळ आणि खर्च वाचवणे, तसेच न्यायप्रक्रिया अधिक पारदर्शक बनवणे, या उद्दिष्टांसाठी ॲड. विशाल कुलकर्णी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांची कार्यपद्धती ही केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित न राहता विधिज्ञांना डिजिटल युगाशी आत्मविश्वासाने जोडणारी आहे.
कराड बार असोसिएशनच्या सन्माननीय वकील सदस्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा ॲड. विशाल एस. कुलकर्णी यांच्या प्रशिक्षण क्षमतेचा व कार्यक्षमतेचा प्रत्यय देणारा आहे. न्यायालयीन डिजिटल युगात विधिज्ञांना मार्गदर्शन करणारे असे प्रशिक्षक ही आजच्या काळाची गरज असून, त्या भूमिकेत ॲड. विशाल कुलकर्णी निश्चितच आदर्श ठरत आहेत.
न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणात योगदान देणाऱ्या विशाल कुलकर्णी यांना आता राज्यभरात इतरत्रही विशेष प्रशिक्षणासाठी बोलावले जात आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#AdvVishalKulkarni
#JudicialDigitalTransformation
#ECourtsIndia
#ICTinJudiciary
#IndianJudiciary
#LegalTechnology
#DigitalCourts
#ECourtsServices
#KaradCourt
#KaradBarAssociation
#AdvocateTraining
#JudicialReforms
#CourtDigitization
#ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या