कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
व्यवसाय म्हणजे केवळ नफा नव्हे, तर तो विश्वासाचा, सातत्याचा आणि गुणवत्तेचा प्रवास असतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे एन पी फिश कंपनी. समुद्राच्या खाऱ्या लाटांपासून ते ग्राहकांच्या ताटापर्यंत पोहोचणाऱ्या ताजेपणाच्या या प्रवासाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
या यशोगाथेची सुरुवात होते ७५ वर्षांपूर्वी मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये. जिथे एका तरुण उद्योजकाच्या मनात एक साधी पण प्रामाणिक इच्छा जन्माला आली की, आपलाही एक व्यवसाय असावा आणि लोकांना ताज्या समुद्री माशांचा खरा स्वाद मिळावा.
ही इच्छा होती कै. महादेव सदोजी पाटील (आण्णा) यांची. एका छोट्याशा रोपट्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय पुढे संपूर्ण पाटील कुटुंबाचा अभिमान ठरला.
परंपरेचा वारसा, पुढील पिढीची जबाबदारी...
दुसऱ्या पिढीत श्री. काशिनाथ महादेव पाटील यांनी मुंबईतील क्रॉफोर्ड मार्केटमध्ये KMP Fish Company उभारून या व्यवसायाची भक्कम पायाभरणी केली. 'गुणवत्तेचा आग्रह, प्रामाणिक व्यवहार आणि ग्राहकांशी नाते' या मूल्यांवर व्यवसाय अधिक मजबूत होत गेला.
आधुनिकतेची जोड आणि कराडमधील नवे पर्व...
कुटुंबातील तिसरी पिढी श्री. अजित काशिनाथ पाटील आणि श्री. सुनिल काशिनाथ पाटील यांनी या परंपरेला आधुनिकतेची जोड दिली. दूरदृष्टी, नियोजन, तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या जोरावर त्यांनी कराड येथे ‘न्यू पाटील फिश कंपनी’ (एन पी फिश कंपनी) सुरू केली.
ही केवळ एक नवी शाखा नव्हती, तर पश्चिम महाराष्ट्रातील मच्छी व्यवसायात बदल घडवणाऱ्या नव्या युगाची सुरुवात होती.
तंत्रज्ञान, थंडसाखळी आणि विश्वासाचा कणा...
'समुद्रकिनाऱ्यांहून रोज थेट ताजी मासळी,
अत्याधुनिक कोल्ड चेन मॅनेजमेंट,
२० हवाबंद वाहनांचा ताफा,
पारदर्शक व्यवहार आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नाही',
या सर्व गोष्टींमुळे आज एन पी फिश कंपनी पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांची नंबर एक पसंती ठरली आहे.
१७ शाखांचा विस्तार, चार जिल्ह्यांत ठसा...
कराडपासून सुरू झालेला हा प्रवास आज वेगाने विस्तारत आहे.
एन पी फिश कंपनीच्या आज एकूण १७ शाखा कार्यरत आहेत.
पुणे जिल्हा : पिंपळे-सौदागर, मोशी
सातारा जिल्हा : सातारा, कराड, पाटण, सैदापूर
सांगली जिल्हा : सांगली, इस्लामपूर, विटा, पलूस, तासगाव
कोल्हापूर जिल्हा : रंकाळा, उचगाव, नागाळा पार्क, वारणा–कोडोली
तसेच मुंबई–पनवेल परिसरातही विस्तार सुरू आहे
हा वाढता आलेख म्हणजे ग्राहकांचा विश्वास, सातत्याने मिळणारा पाठिंबा आणि गुंतवणूकदारांचा मजबूत विश्वास याचीच पोहोचपावती आहे.
एन पी फिश – केवळ मासळी नव्हे, संपूर्ण ब्रँड इकोसिस्टीम....
आज एन पी फिश कंपनीने केवळ मासळी विक्रीपुरते स्वतःला मर्यादित ठेवलेले नाही.
एन पी फिश फॅमिली रेस्टॉरंट,
एन पी फिश मसाले,
एन पी फिश हाऊस,
फ्राय काउंटर (आउटलेट्स),
या उपक्रमांमुळे ब्रँड अधिक व्यापक, विश्वासार्ह आणि ग्राहकाभिमुख झाला आहे.
रोजगार, समाज आणि भविष्य...
आज ३०० हून अधिक कुटुंबांना रोजगार,
हजारो ग्राहकांचा दररोजचा विश्वास,
आणि समुद्रापासून ताटापर्यंत अखंड गुणवत्तेची साखळी—
हीच पाटील बंधूंची खरी ओळख आहे.
आजही ते एकच ध्येय जपतात की,
'सामान्य माणसापर्यंत समुद्रातील सर्वोत्तम मासे पोहोचवणे आणि गुणवत्तेत कधीही तडजोड न करणे.'
परंपरेतून उभा राहिलेला, आधुनिकतेला कवेत घेणारा आणि विश्वासावर उभारलेला हा प्रवास म्हणजेच,
एन पी फिश कंपनीची ७५ वर्षांची प्रेरणादायी ब्रँड स्टोरी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#NPFishCompany #एनपीफिशकंपनी #PatilFishBusiness #NPFish75Years #FishBusinessMaharashtra
#75YearsOfTrust #BusinessLegacy #FamilyBusiness #QualitySeafood #TrustAndQuality
#Karad #Satara #WesternMaharashtra #Kolhapur #Sangli #Pune #Mumbai
#ChangbhalaNews #MarathiBusinessNews #BrandStory #SuccessStory #EntrepreneurshipMarathi


0 टिप्पण्या