🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

‘कृष्णा’कडून ७०.५४ कोटींचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

 

कृष्णा साखर कारखान्याने ७०.५४ कोटींचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची बातमी – प्रतिटन ३५०० रुपयांचा दर घोषित.

ऊसदराची कोंडी फोडल्यानंतर आता बिलवाटपातही कृष्णा कारखाना आघाडीवर

कराड प्रतिनिधी, दि. ३ डिसेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा

येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या २०२५–२६ गाळप हंगामात जिल्ह्यात सर्वांत पहिल्यांदा ऊस दराची कोंडी फोडत प्रतिटन ३५०० रुपयांचा दर जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला होता. या निर्णयाचे समाधान व्यक्त होत असतानाच, आता कृष्णा कारखान्याने जिल्ह्यात सर्वांत प्रथम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा करून पुन्हा एकदा आघाडी सिद्ध केली आहे.

कारखान्याला पहिल्या पंधरवड्यात पुरवठा झालेल्या ऊसाची प्रतिटन ३५०० रुपयांप्रमाणे होणारी बिलाची एकूण रक्कम ७० कोटी ५४ लाख रुपये शेतकरी सभासदांच्या बँक खात्यांमध्ये थेट वर्ग करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चालू हंगामाच्या सुरुवातीलाच आवश्यक आर्थिक आधार मिळाला आहे.

कृष्णा कारखान्याने नेहमीच शेतकरी सभासदांचे हित जपत पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले आहे. गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी ऊस उत्पादकांना न्याय्य आणि स्पर्धात्मक दर देत, आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाच्या हंगामासाठी ऊसदराची कोंडी फोडून प्रतिटन ३५०० रुपयांचा दर जाहीर केल्याने, सभासद शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात होते. कृष्णा कारखाना केवळ दर देऊनच थांबलेला नाही; तर पहिल्या पंधरवड्यात कारखान्याकडे गळितास आलेल्या ऊसापोटी प्रतिटन ३५०० रूपयांप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याने, शेतकरी सभासदांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

शेतकरी हिताची परंपरा अधिक दृढ

पारदर्शी कामकाज, आर्थिक शिस्त आणि शेतकरी केंद्रित निर्णयांमुळे कृष्णा कारखान्याने गावोगावी सभासद शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे मजबूत नाते निर्माण केले आहे. यंदा ऊसदराची कोंडी फोडत, तसेच सर्वप्रथम बिलवाटप करुन कारखान्याने शेतकरी हिताची परंपरा अधिक दृढ केली आहे.


#KrishnaSakharKarkhana #UsBillVatang #KaradNews #SataraNews #ChangbhalaNews #UsDar2025 #SakharKarkhanaUpdates #FarmerSupport #MaharashtraSugarIndustry #AgriNews #KaradLatestUpdate #SureshBhosale #KrishnaFactory #UsHingam2025 #ShetiVarta #UsProducer #UsKarkhana #CooperativeNews #SugarFactoryNews #KrishnaAgro

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या