🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड नगरपालिका निवडणुकीत तब्बल ६९.८९ टक्के मतदान; ४८,८१३ मतदारांनी बजावला हक्क

कराड नगरपालिका निवडणूक २०२५: मतदान केंद्रावर मतदारांची रांग

हैबत आडके, कराड | दि. २ डिसेंबर २०२५


कराड नगरपालिका निवडणुकीत शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ६९.८९ टक्के मतदान नोंदवले. ४८,८१३ मतदारांनी आपला लोकशाही हक्क बजावला असून शहरातील एकूण ६९,८३६ मतदारांपैकी २४,८१९ पुरुष, २३,९९० महिला आणि ४ इतर मतदारांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग घेत मतदान केले.



निवडणुकीसाठी पालिकेच्या ३० नगरसेवक जागांसाठी १०६ उमेदवार, तसेच नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. यामध्ये भाजपचे विनायक पावसकर, यशवंत व लोकशाही आघाडीचे राजेंद्रसिंह यादव, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे झाकीर पठाण, बहुजन समाज पक्षाचे इम्रान मुल्ला, चांगभलं, अपक्ष रणजीत पाटील, शरद देव, गणेश कापसे, बापू लांडगे, ऍड श्रीकांत घोडके या ९ उमेदवारांचा तर नगरसेवक पदाच्या ३० जागांसाठी १०६ उमेदवारांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३ डिसेंबर रोजी होणारा निकाल २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन जाहीर करण्यात येणार आहे. प्रचार काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री अशा दिग्गजांच्या सलग सभांमुळे शहरात चुरस वाढली होती.


सकाळपासून संध्याकाळपर्यंतची मतदानाची धावपळ...

मतदान प्रक्रियेला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली.
– सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान ५,१६० (७.३९%)
– ९.३० ते ११.३० दरम्यान १३,५७५ (१९.४३%)
– ११.३० ते १.३० दरम्यान २४,३६२ (३४.८८%)
– १.३० ते ३.३० दरम्यान ३५,२६६ (५०.५०%)
– मतदानाचा वेळ संपेपर्यंत एकूण ४८,८१३ (६९.८९%) मतदान झाले.

शहरातील एकूण मतदारसंख्या.....
– पुरुष : ३४,८३१
– महिला : ३४,९९३
– इतर : १२
– एकूण : ६९,८३६


प्रभागनिहाय एकूण मतदार व प्रत्यक्ष मतदान...
पहिल्या प्रभागात एकूण ४,०४९ मतदार असून त्यात २,०३४ पुरुष, २,०१४ महिला व १ इतर आहे. यातील प्रत्यक्ष मतदानात १,५०५ पुरुष, १,५१७ महिला यांनी सहभाग घेतला (चांगभलं) आणि एकूण ३,०२२ मतांची नोंद होऊन ७४.६३% मतदान झाले.
दुसऱ्या प्रभागात एकूण ३,४८१ मतदारांपैकी १,७७० पुरुष, १,७१० महिला व १ इतर असून प्रत्यक्ष २,२४४ मतांची नोंद होऊन ६४.४६% मतदान झाले.
तिसऱ्या प्रभागातील ३,९४१ मतदारांपैकी पुरुष २,०३९, महिला १,९००, इतर २ असे असून प्रत्यक्षात ३,०१५ मतदान झाले, ७६.५० टक्के इतके मतदान झाले.

 



चौथ्या प्रभागात ३,५१४ पैकी पुरुष १,७६६, महिला १,७४५, इतर ३ असून प्रत्यक्ष २,१४७ म्हणजे ६१.०९% मतदान झाले.
पाचव्या प्रभागात ५,५६२ पैकी पुरुष २,७५५, महिला २,८६५, इतर ० मतदान असून प्रत्यक्ष ४,१२९ मतदारांनी (७३.४७%) हक्क बजावला.
सहाव्या प्रभागात ४,९०४ पैकी पुरुष २,४०५, महिला २,४९८, इतर १ असून प्रत्यक्षात ३,६२९ मतदारांनी हक्क बजावल्याने ७४ टक्के मतदान झाले.
सातव्या प्रभागात ३,९०४ पैकी पुरुष १,९०८, महिला १,९९६, इतर ० असून, प्रत्यक्षात २,७८७ म्हणजे ७१.३८% मतदान झाले.
आठव्या प्रभागात ४,९४९ पैकी पुरुष २,४९०, महिला २,४५९, इतर ० असे असून प्रत्यक्षात ३,३६६ (६८.०१%) मतदारांनी हक्क बजावला.



नवव्या प्रभागात ५,९१८ पैकी पुरुष २,९८४, महिला २,९३४ असून प्रत्यक्ष ४,६०१ म्हणजे ७७.७४% मतदान झाले.
दहाव्या प्रभागात ४,९६४ पैकी पुरुष २,४०५, महिला २,५५८ असून प्रत्यक्ष ३,४९६ म्हणजे ७०.४२%. चांगभलं.
अकराव्या प्रभागात ४,४४७ मतदार (चांगभलं) असून पुरुष २,१२४, महिला २,३२२, प्रत्यक्षात ३,०७५ म्हणजेच ६९.१४% मतदान झाले.
बाराव्या प्रभागातील ५,७१० मतदारांपैकी २,८५९ पुरुष, २,८५१ महिला, असून प्रत्यक्ष ३,७६२ म्हणजे ६५.८८%.
तेराव्या प्रभागात ३,४१७ पैकी पुरुष १,७६०, महिला १,६५७ असून प्रत्यक्षात २,३३१ म्हणजे ६८.२१%.

 



चौदाव्या प्रभागात ४,१३५ पैकी पुरुष २,१०३, महिला २,०३१ असून प्रत्यक्ष २,७८६ म्हणजेच ६७.३७%.
तर पंधराव्या प्रभागात ६,८८३ पैकी पुरुष ३,४२९, महिला ३,४५३, इतर १ असून प्रत्यक्षात ४,४२३ म्हणजेच ६४.२५% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

शहरातील दिग्गजांचे मतदान..
माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रभाग ५ मधील कराड नगरपरिषद शाळा क्र. ९ येथे मतदानाचा हक्क बजावला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी यशवंत हायस्कूल येथे कुटुंबियांसह मतदान केले.


#कराडनगरपालिका #कराडनिकाल #कराडमतदान #KaradElection2025 #KaradMunicipalElection #मतदान६९टक्के #कराडनगराध्यक्ष #कराड #लोकशाहीआघाडी #MaharashtraLocalBodyElection #सातारा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भुरट्या व (भुरटी) पत्रकारांसाठी विशेष सूचना - © Changbhala News - परवानगीशिवाय बातमी मधील मजकूर किंवा मजकुराचा काही भाग कॉपी करून वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या