मलकापूर - कराड, दि. ३० नोव्हेंबर २०२५|चांगभलं वृत्तसेवा
न्यायालयाच्या आदेशामुळे मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मधील प्रभाग 4A आणि प्रभाग 8A मधील जागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. आता राज्य निवडणूक आयोगाने या दोन जागांसाठी स्वतंत्र नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ 2025/सुनिका/नप/प्र.क्र.14/का.6, दि. 29 नोव्हेंबर 2025 नुसार बाधित नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी सुधारित कार्यक्रम तयार करण्यात आला असून, मलकापूरातील प्रभाग 4A आणि 8A साठी हा कार्यक्रम लागू राहणार आहे.
नवीन कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक कार्यक्रम 4 डिसेंबर 2025 रोजी जारी होणार आहे. उमेदवारांना आपल्या नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यासाठी 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 11 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
आवश्यकतेनुसार मतदानाची प्रक्रिया 20 डिसेंबर 2025 रोजी पार पडेल. मतदानाचा कालावधी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 असा ठेवण्यात आला आहे. मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. अधिकृत निकाल शासन राजपत्रात 23 डिसेंबर 2025 पूर्वी, कलम 19 च्या तरतुदीनुसार प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
हा संपूर्ण सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार, सचिव सुरेश काकाणी यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
#MalkapurElection2025 #MalkapurNagarParishad #Malkapur4A #Malkapur8A #MalkapurNews #KaradNews #SataraNews #ChangbhalaNews #MaharashtraElection #MunicipalElection2025 #Nivadnuk2025 #MalkapurLiveUpdates

0 टिप्पण्या