🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

श्री क्षेत्र कुंभारगाव येथील श्री निलाताई चंद्राताई देवीच्या वार्षिक यात्रेची तयारी पूर्ण; २५ ते २७ जानेवारी दरम्यान यात्रेचे आयोजन

 

श्री निलाताई चंद्राताई देवी वार्षिक यात्रा 2026 कुंभारगाव

सोमवार, २६ जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस


हैबत आडके, कराड | चांगभलं वृत्तसेवा

श्री क्षेत्र कुंभारगाव (मठ) ता. कडेगाव येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री निलाताई चंद्राताई देवीची वार्षिक यात्रा येत्या रविवार दि. २५ जानेवारी २०२६ ते मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ या कालावधीत भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे. सोमवार, २६ जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस असून यात्रेचे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरच दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन विविध सोयी सुविधा व सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

यात्रेच्या प्रथम दिवशी रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी देवीस प्रथा-परंपरेप्रमाणे 'खारी आंबील' अर्पण करण्यात येणार आहे. रात्री देवीचा पारंपरिक जागर आयोजित करण्यात आला असून यामध्ये पोतराज गीतांचे सादरीकरण तसेच विविध नामवंत कलावंतांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे.

यात्रेचा मुख्य दिवस सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ असून या दिवशी सकाळपासून देवीस दंडस्थान व लोटांगण घालून भाविक दर्शन घेणार आहेत. याच दिवशी देवीस पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात येणार असून कार्तिकी चढवण्याचा विधी मोठ्या श्रद्धेने पार पडणार आहे. रात्री पुन्हा एकदा देवीचा जागर, पोतराज गीतांचा व भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार असून दरवर्षी होणाऱ्या भाविकांच्या मोठी गर्दीत यंदा वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व नियोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ रोजी देवीस खिरीचा प्रसाद वाटप करण्यात येणार असून याच दिवशी देवीच्या सव्वा महिन्याच्या कार्तिकी उपवासांना सुरुवात होणार आहे.

या यात्रेसाठी परिसरातील तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची मोठी उपस्थिती लाभते. भाविकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घ्यावा, यात्रेतील धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावावी, श्रवणीय भक्ती गीतांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुंभारगाव मठाचे धर्मस्वामी चंद्रकांत रामकृष्णराव पाटील (आण्णा) यांनी केले आहे.

दि. २५ व २६ रोजी रात्री भक्तीगीतांचा जागर...


श्री क्षेत्र कुंभारगाव (मठ) ता.कडेगाव जि.सांगली येथील श्री निलाताई चंद्राताई देवस्थान यात्रेनिमित्त दि. २५ व दि. २६ जानेवारीच्या रात्री प्रबोधनकार पोतराज यांच्या भक्तीगीतांचा जागर रंगणार आहे. कार्यक्रमाचे व कलावंतांचे अध्यक्ष श्री संतोष यलगुर्दराव पाटील (आण्णा धर्मस्वामी), विशेष सहकार्य श्री कृष्णा (पोपट) माने घारेवाडी (कराड), श्री सुनिल भिमराव तोरणे (घरनिकी देवीचे सेवेकरी), श्री सचिन खिलारे (कराड देवीचे सेवेकरी), श्री राम साठे (बनवडी देवीचे सेवेकरी), श्री बापू आवळे (धारपुडी देवीचे सेवेकरी), श्री आनंदा लोखंडे (कुर्ली देवीचे सेवेकरी), श्री ऋषिकेश महापुरे (मारूल), श्री आनंदा आवळे (दरुज) या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कलावंतांची यात्रेपूर्वी बैठक पार पडली. यावेळी कुंभारगावाच्या मठात मध्ये देवीला येणारा प्रत्येक पोतराज कलावंतांना श्री निलाताई चंद्राताई देवीचे सेवेकरी म्हणून प्रत्येकाला मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक कलावंतांना कार्यक्रम सादर करण्यासाठी लागणारा वेळ निश्चित करण्यात आला. त्यानंतर सर्वसामान्य कलावंतांना एक-दोन भक्तीगीते गाण्याची संधी देण्याचा, काही कलावंतांना हलगीवरती सुद्धा भक्ती गीते सादर करू देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कोणत्याही पोतराज कलावंतानी आई निलाताईची गादी बसवू नये परंतु भक्तीगीतांचा कार्यक्रम करावा, असे सुचित करण्यात आले. यात्रे दिवशी होणाऱ्या पोतराज गीतांच्या कार्यक्रमांना संगीतकार - आर्गन मास्टर - जीवन केंगार (चिखली), ढोलकी मास्तर - संकल्प हेगडे (बनपुरी), कच्ची मास्तर - आनंदा आवळे (दरूज), सूत्रसंचालन - ऋषिकेश महापुरे (मारूल), साऊंड सिस्टिम - महेश डूबल (खालकरवाडी) हे साथ करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#श्रीनिलाताईचंद्राताईदेवीवार्षिकयात्रा२०२६ #कुंभारगाव

#श्रीक्षेत्रकुंभारगाव #कडेगाव #कुंभारगावमठ

#सुनीलपोतराज #कुंभारगावयात्रा #चांगभलं #चांगभलंन्यूज

#ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या