🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

‘कृष्णा’च्या डॉ. टी. पूविष्णु देवी यांची आंतरराष्ट्रीय प्राध्यापकपदी नियुक्ती

 फिजिओथेरपी क्षेत्रातील भारतातून पहिलीच नियुक्ती; कृष्णा विद्यापीठाच्या कार्याला जागतिक मान्यता




कराड प्रतिनिधी |चांगभलं वृत्तसेवा


मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील ‘ग्लोबल नेटवर्क ऑफ बायोइथिक्स, मेडिकल ॲन्ड प्रोफेशन्स एज्युकेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने कृष्णा विश्व विद्यापीठातील फिजिओथेरपी विभागाच्या अधिष्ठाता डॉ. टी. पूविष्णु देवी यांची अलाईड हेल्थ सायन्सेस व फिजिओथेरपी विद्याशाखेच्या ‘आंतरराष्ट्रीय प्राध्यापक’पदी नियुक्ती केली आहे. याबद्दल कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

तामिळनाडुतील एस.आर.एम. विद्यापीठात ‘ग्लोबल नेटवर्क ऑफ बायोइथिक्स, मेडिकल ॲन्ड प्रोफेशन्स एज्युकेशन’ संस्थेच्या नुकत्याच झालेल्या ५ व्या आंतरराष्ट्रीय बैठकीत ‘ग्लोबल नेटवर्क’चे अध्यक्ष डॉ. प्रा. रसेल डिसूझा यांच्या हस्ते व सरचिटणीस डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा विद्यापीठाच्या डॉ. पूविष्णु देवी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांनी कार्यालयीन प्रत स्वीकारली.

ही नियुक्ती अलाईड हेल्थ सायन्सेस आणि फिजिओथेरपी क्षेत्रातील भारतातून पहिलीच इंटरनॅशनल फॅकल्टी नियुक्ती ठरली असून, त्यामुळे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचे अधोरेखित झाले आहे. तसेच या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि संशोधनपर परंपरेला नव्या उंचीची जोड मिळाली आहे.

या यशाबद्दल कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डॉ. पूविष्णु देवी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुलपतींचे सल्लागार आणि ‘ग्लोबल नेटवर्क’चे सरचिटणीस डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, डॉ. हरी वासुदेवन आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या