🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सैनिक स्कूल निवडीबद्दल आदिश्नी तडाके हिचा मुक्ता प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

मालखेड ( ता. कराड ) येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आदीश्री सचिन तडाके हिची सैनिक स्कूलसाठी निवड झाल्याबद्दल मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान बेलवडे बुद्रुक - कराड व बेलवडे बुद्रुक येथील ग्रामस्थ यांच्यावतीने मंगळवारी (दि.३) बेलवडे बुद्रुक येथे सत्कार करण्यात आला.

आदिश्री ही मालखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आहे. सैनिक स्कूल प्रवेशासाठी झालेल्या परीक्षेत तिने प्राविण्य मिळवल्याने तिचा बेलवडे बुद्रुक येथील मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान व बेलवडे बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने संयुक्तिक सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, बुके असे सत्काराचे स्वरूप होते.

यावेळी मुक्ता प्रतिष्ठानचे संजय तडाके यांच्यासह प्रशांत मोहिते, जयवंतराव मोहिते, दत्तात्रय मोहिते, भास्कर तडाके, तानाजीराव वाघमारे, लालासाहेब तडाके, सुभाष तडाके, रवींद्र भोसले, दादासो तडाके, निलेश तडाके, सुमित तडाके आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या