🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

यशस्वी फार्मासिस्ट होण्यासाठी संशोधन आणि प्रत्यक्ष सराव आवश्यक - प्रा. डॉ. महादेव राव

 

कराड : कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्यावतीने आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे उद्‌घाटन करताना ‘ग्लोबल कॅन्सर कन्सोर्टियम’चे सहसंस्थापक प्रा. डॉ. महादेव राव. बाजूस डॉ. प्रवीण शिणगारे, डॉ. एम. व्ही. घोरपडे, डॉ. जी. हिमाश्री, डॉ. विजय कणसे, डॉ. डी. के. अगरवाल आणि डॉ. एन. आर. जाधव.

कृष्णा विश्व विद्यापीठात तिसरी राष्ट्रीय विद्यार्थी परिषद उत्साहात

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
यशस्वी फार्मासिस्ट होण्यासाठी संशोधन आणि प्रत्यक्ष सराव यांचा समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन ‘ग्लोबल कॅन्सर कन्सोर्टियम’चे सहसंस्थापक प्रा. डॉ. महादेव राव यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टिचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा विश्व विद्यापीठात ‘अचूक औषधोपचार, उपचारात्मक औषध निरीक्षण आणि पदार्थ निगराणीद्वारे रुग्ण सुरक्षेला चालना’ या विषयावर आयोजित ३ री राष्ट्रीय विद्यार्थी परिषद उत्साहात संपन्न झाली.

प्रा. डॉ. महादेव राव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन परिषदेचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कृष्णा विद्यापीठाच्या कुलपतींचे सल्लागार डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, संशोधक संचालक डॉ. जी. हिमाश्री, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा.डॉ. राव पुढे म्हणाले, कर्करोग उपचारांमध्ये वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या उपचारांची गरज आहे. ‘गो ग्लोबल’ पेक्षा ‘गो लोकल’ ही संकल्पना अधिक उपयुक्त असून, भारतीय रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन करणे आवश्यक आहे. डॉक्टर, संशोधक आणि वैज्ञानिक यांच्या समन्वयातूनच आरोग्यसेवेत गुणात्मक बदल घडू शकतात.

डॉ. शिणगारे म्हणाले, की औषधे आणि सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० पासून अस्तित्वात असला तरी दीर्घकाळ त्यात बदल झाले नव्हते. मात्र २००५ नंतर वैद्यकीय उपकरणांनाही या कायद्यात समाविष्ट करून नियंत्रण व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली. कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली ही परिषद संशोधन व आरोग्यसेवा क्षेत्रातील नव्या संधींचे दालन उघडणारी ठरणार आहे. तसेच भविष्यात अशा परिषदांमधून रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल.

डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले, की भारत आज जागतिक स्तरावर ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळखला जात असून, या प्रगतीत फार्मासिस्ट्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वी किरकोळ औषध विक्रीपुरते मर्यादित असलेले हे क्षेत्र आज उत्पादन, संशोधन आणि क्लिनिकल सेवांपर्यंत विस्तारले आहे. आज फार्मासिस्ट्स डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनून, उपचारांच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

या परिषदेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या