🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

महाराष्ट्राचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शनिवारी (दि. २८) होणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे, की सध्याच्या शोकमय वातावरणात वाढदिवस साजरा करणे उचित नसून, या दिवशी ते नागरिकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. तसेच यादिवशी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, सत्कार किंवा उत्सव आयोजित करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून, सर्व सहकारी व कार्यकर्त्यांनीही साधेपणा पाळून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या