चेतन मछले यांची पुणे ग्रामीणला बदली तर हेमंत काटकर नवे प्रभारी अधिकारी
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
मल्हारपेठ पोलिस ठाण्यात अलीकडेच प्रशासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, सध्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांची पुणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सोलापूर येथून बदली होऊन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत काटकर यांच्याकडे मल्हारपेठ पोलिस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
सपोनि मछले यांनी आपल्या कार्यकाळात पुसेगाव, बोरगाव, कराड वाहतूक शाखा तसेच मल्हारपेठ येथे उल्लेखनीय कामगिरी करत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि कार्यक्षमतेमुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच त्यांच्या बदलीची चर्चा जिल्हाभरात होत आहे.
दरम्यान, नव्याने पदभार स्वीकारणारे सपोनि हेमंत काटकर यांच्यासमोर आता हीच सकारात्मक परंपरा मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पुढे नेण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मल्हारपेठ पोलिस ठाण्याची कार्यशैली कशी राहते आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान ते कसे पेलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#Malharpeth #Police #SataraPolice #Patan
#KaradNews #ChangbhalaNews #चांगभलं
#चांगभलंन्यूज

0 टिप्पण्या