🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

पशुपालकांसाठी ‘शून्य टक्के व्याज’ योजना; ३ लाखांपर्यंत कर्ज मिळवण्याची संधी

 


सातारा | चांगभलं वृत्तसेवा

राज्यातील पशुपालकांना मोठा आर्थिक दिलासा देणारी योजना प्रभावीपणे राबवली जात असून, ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड (KCC)’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जसुविधा उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे, वेळेत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना हे कर्ज प्रत्यक्षात बिनव्याजी ठरत आहे.
पशुपालन, शेळी-मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दैनंदिन खर्च, पशुखाद्य व देखभाल यासाठी आवश्यक भांडवल सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील लहान व मध्यम पशुपालकांसाठी ही योजना विशेष उपयुक्त ठरत आहे.
योजनेअंतर्गत, ज्यांच्याकडे अद्याप किसान क्रेडिट कार्ड नाही, अशा शेतकऱ्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही तारणाशिवाय दिले जाते. तर दूध संघाचे सदस्य असलेल्या व संस्थेची हमी असलेल्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमर्यादा वाढवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आधीपासूनच पीक कर्जासाठी KCC असलेल्या शेतकऱ्यांनाही पशुपालनासाठी अतिरिक्त कर्जमर्यादा मिळू शकते.

या कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी, केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलतीमुळे वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळतो. यामुळे पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

योजनेचे मुख्य फायदे.....

🔹३ लाख रुपयांपर्यंत कर्जसुविधा.
🔹वेळेत परतफेड केल्यास शून्य टक्के व्याज.
🔹तारणाशिवाय १.६० लाखांपर्यंत कर्ज.
🔹पशुपालन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालनासाठी उपयुक्त.
🔹दूध संस्थेची हमी असल्यास वाढीव कर्जमर्यादा .

पात्रता व अटी....
🔹पशुधनाची नोंद ‘भारत पशुधन’ पोर्टलवर असणे आवश्यक.
🔹अर्जदाराने अन्य शासकीय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
🔹कर्ज घेतल्यापासून एका वर्षात परतफेड बंधनकारक.
🔹बँक व संबंधित संस्थेच्या अटी लागू .

संपर्क असा करा...
🔹जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा
🔹हेल्पलाइन क्रमांक : १९६२
🔹जिल्हा स्तरावर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी मार्गदर्शनासाठी उपलब्ध.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#पशुसंवर्धनकर्जयोजना #बिनव्याजीकर्ज #पशुपालन

#चांगभलंन्यूज #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या