🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड पालिकेचा स्तुत्य उपक्रम : ४२५ दिव्यांगांना २६.८७ लाखांचे आर्थिक सहाय्य

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या संयुक्त पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी आयोजित अनुदान वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पालिका प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात तब्बल ४२५ दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण २६ लाख ८७ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, नगरसेवक जयंत पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती किर्तिका विभूते, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर तसेच विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. रुपाली माने यांनी भूषविले.
प्रास्ताविक करताना सौ. रुपाली माने यांनी दिव्यांग व्यक्तींच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत प्रेरणादायी उदाहरणे मांडली. प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करणाऱ्या व्यक्तींच्या कथा सांगत त्यांनी ‘दिव्यांगता ही अडथळा नसून इच्छाशक्तीच खरी ताकद आहे’ असा सकारात्मक संदेश दिला.
मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी पालिकेच्या विविध योजनांची माहिती देताना सांगितले की, दिव्यांगत्वाच्या प्रमाणानुसार दोन टप्प्यांत अनुदान वितरित केले जाते. यंदा ४० ते ६० टक्के दिव्यांगत्व असलेल्या २१६ लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये, ६१ ते ८० टक्के असलेल्या ११३ लाभार्थ्यांना प्रत्येकी १७ हजार रुपये, तर ८१ ते १०० टक्के दिव्यांगत्व असलेल्या ९६ लाभार्थ्यांना प्रत्येकी १८ हजार ५०० रुपये इतके सहाय्य देण्यात आले.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिका विविध योजना राबवत असून आर्थिक सहाय्याद्वारे त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. तसेच राज्याच्या पर्यटन धोरणांतर्गत दिव्यांगांना उद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी १५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान दिव्यांग बचत गटांचा सत्कार करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाच्या व्यवस्थापक तथा समुपदेशक अधिकारी दिपाली दिवटे यांनी योजनांची सविस्तर माहिती दिली आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी उपसभापती किर्तिका विभूते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या