🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कार्वे नाक्यावर अत्याधुनिक ‘शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र’ उभारणार

 १५ व्या वित्त आयोगातून निधी मंजूर ; माता-बाल संगोपन, लसीकरण आणि प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार एकाच छताखाली



कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड शहराच्या वाढत्या विस्तारासोबत नागरिकांसाठी अधिक सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्वे नाका परिसरात लवकरच नवीन ‘शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र’ सुरू होणार आहे. शासनाकडून या केंद्राला अधिकृत मान्यता मिळाली असून, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा प्रकल्प साकारला जाणार आहे.
कार्वे नाका व परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या भागात स्वतंत्र आरोग्य केंद्राची गरज निर्माण झाली होती. आतापर्यंत उपचारांसाठी नागरिकांना शहरातील इतर भागात जावे लागत होते. मात्र, नवीन केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना जवळच प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
या केंद्रामध्ये माता व बालकांसाठी आवश्यक आरोग्य सेवा, लसीकरण, नियमित तपासण्या, प्राथमिक उपचार, तसेच सर्वसामान्य आजारांवरील उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हे केंद्र मोठा आधार ठरणार आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही येथे मोफत किंवा अत्यल्प दरात आरोग्य सेवा मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या प्रकल्पासाठी राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केले. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतला.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले की, कराड शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, नागरिकांसाठी अधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करणे ही काळाची गरज होती. कार्वे नाका परिसरात सुरू होणारे हे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. विशेषतः माता-बाल आरोग्य आणि प्राथमिक उपचारासाठी या केंद्राचा मोठा फायदा होणार आहे.
केंद्र लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यानंतर कार्वे नाका परिसरातील हजारो नागरिकांना आरोग्य सेवेसाठी दूरवर जाण्याची आवश्यकता उरणार नाही. शहराच्या आरोग्य व्यवस्थेत हे केंद्र महत्त्वाची भर ठरणार असल्याचे मानले जात आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #Karad #KaradCity #KaradNagarpalika #कराडनगरपालिका

#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या