🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड दक्षिणची ‘सोलार क्रांती’कडे वाटचाल

 आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते नांदगाव-विंग येथे पीएम सूर्यघर प्रकल्पांचे लोकार्पण ; मतदार वीजबिल मुक्त करण्याचा निर्धार



कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड तालुक्यातील नांदगाव आणि विंग या गावांमध्ये उभारण्यात आलेल्या पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सौर प्रकल्पांचे लोकार्पण आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उपक्रमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घरगुती वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी निर्धार त्यांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमास प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपअभियंता स्वप्नील जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पंचायत समिती सदस्य गोविंद गावडे, मंडल अध्यक्ष सीमा साबणे, सरपंच हंबीरराव पाटील, योगेश पाटील, अवधूत इनामदार, हर्षवर्धन मोहिते, सागर पाटील, सर्जेराव थोरात, शंकरराव थोरात, सचिन पाटील, सुशांत मोहिते, अभिजीत कोठावळे, दीपक हजारे, दत्तात्रय माने, तानाजी चौरे, दत्तात्रय थोरात, मारुती मोहिते यांसह मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना आमदार भोसले यांनी योजनेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, मतदारसंघात सध्या सुमारे १० हजार घरांवर १ ते ३ किलोवॅट क्षमतेचे सोलार प्रकल्प उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यात ३० एप्रिलपर्यंत सुमारे दीड हजार घरांवर सोलार यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पूर्वी प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आलेल्या सोलार प्रकल्पांमुळे नागरिकांना दरमहा येणारे १३०० ते २५०० रुपयांचे वीजबिल पूर्णपणे शून्यावर आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


केंद्र शासनाची पीएम सूर्यघर योजना कृष्णा सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवली जात असून, राज्याच्या ऊर्जा विभागाच्या सहकार्याने नागरिकांना कोणतीही अडचण न येता प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना दर्जेदार पद्धतीने राबवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कराड दक्षिण मतदारसंघाला ‘वीजबिलमुक्त’ बनवण्याचा संकल्प करताना, हा प्रकल्प राज्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वास आमदार भोसले यांनी व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील एक कोटी घरांपर्यंत पीएम सूर्यघर योजना पोहोचवण्याच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठे योगदान देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#नांदगाव #विंग #सोलरप्रकल्प #कराडदक्षिण #भाजप

#अतुलबाबाभोसले #चांगभलंन्यूज #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या